SHIVSENA :आगामी निवडणुकांसाठी शिवसैनिकांनी सज्ज रहावे: माजी आ.चंद्रकांत रघुवंशी..

0
903

विधानसभा मतदारसंघ निहाय सदस्य नोंदणीसाठी बैठक

नंदुरबार -५/७/२३

SHIVSENA:शिवसेनेच्या (शिंदे गट) प्राथमिक सदस्य नोंदणीच्या मोहिमेला सुरुवात झालेली आहे. जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी ५ हजारांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, कार्यकर्त्यांनी मोहीम यशस्वी करावी. आगामी कालावधीत कधीही निवडणुका लागू शकतील यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहण्याचे आवाहन संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.

 WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

नंदुरबार शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात रविवारी सकाळी ११ वाजता जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी माजी आ. रघुवंशी यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर जिल्हाप्रमुख राम रघुवंशी,जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे,जि.प सदस्य विजय पराडके, धडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष धनसिंग पराडके, उपजिल्हाप्रमुख गौतम जैन, पुरुषदास पाटील,राजेंद्र पेंढारकर, नंदुरबार तालुका प्रमुख डॉ. सयाजीराव मोरे, तळोदा तालुकाप्रमुख अनुप उदासी नवापूर तालुका प्रमुख बकाराम गावित उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा :

GOOD NEWS:कोंडलेल्या स्मारक चौकाचा श्वास अखेर झाला मोकळा..

Ajit Pawar बनले राज्याचे नवे उपमुख्यमंत्री …

यावेळी संपर्कप्रमुख तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, शिवसेनेचे कार्य जिल्ह्यातील प्रत्येक गाव,पाडे, वाडी वस्त्यांपर्यंत पोहोचवा. प्रत्येक बूथ स्तरावर सदस्य नोंदणी करायची आहे.जिल्ह्यातील नवापूर,नंदुरबार,शहादा- तळोदा,अक्कलकुवा विधानसभा क्षेत्रनिहाय प्रत्येकी ५ अश्या २० हजार सदस्यांची नोंदणी करायची आहे. सदस्य नोंदणी अभियान यशस्वी करावे

संघटन बांधणी मजबूत करा :ॲड राम रघुवंशी

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदराव दिघे यांच्या विचारांच्या शिवसेनेचे कार्य शिवसैनिकांनी सर्वत्र पोहोचवावे. पक्ष संघटन मजबूत करायचे असेल तर तळागाळातील सर्वच कार्यकर्त्यांची मदत लागत असते. पक्षाला अधिकाधिक यश प्राप्त करण्यासाठी संघटन बांधणी मजबूत करावा लागेल असे जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांनी सांगितले.

एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here