Dhule News Today – धुळे लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष आणि कॉग्रेसच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या मालमत्तेच्या विवरणानुसार, भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या तुलनेत कॉग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव श्रीमंत आहेत.
डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे ७ कोटी ४३ लाख ७१ हजाराची स्थावर मालमत्ता आहे, तर डॉ. शोभा बच्छाव यांच्याकडे १४ कोटी ३२ लाख १० हजार ७९३ रूपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञा पत्रात नमूद करण्यात आलेले आहे.( Dhule News Today )
‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे किती मालमत्ता…
डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे ६ लाख ८४ हजार, तर त्यांच्या पत्नीकडे ८ लाख रुपयांची रोख रक्कम आहे. डॉ. भामरे यांच्याकडे २ कोटी ८४ लाख ५२ हजार ९६९ रुपयांची, तर त्यांच्या पत्नीकडे ३ कोटी ७७ लाख २१ हजार ५७९ रूपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यात विविध बँकेतील मुदत ठेवी, शेअर्सचा समावेश आहे.
डॉ. सुभाष भामरे यांच्यावर कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेचे डॉ. सुभाष भामरे कर्ज नाही. वरळी येथे त्यांच्या मालकीची सदनिका आहे. त्यांच्या नावावर धुळे तालुक्यातील खेडे येथे १२ एकर, तर न्याहळोद येथे १५ एकर जमीन आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे खेडे येथे १८ एकर जमीन आहे. डॉ. भामरे यांच्या पत्नीकडे ३६७.७७ ग्रॅम सोने आहे. त्याचे मूल्य २७ लाख २१ हजार ४९८ रूपये एवढे आहे. शिवाय २८ हजारांचा एक हिरा आहे. डॉ. भामरे यांची स्थावर मालमत्ता ७ कोटी ४३ लाख ७१ हजार रुपये किंमतीची, तर त्यांच्या पत्नीची स्थावर मालमत्ता ४ कोटी ७० लाख ४६ हजार रूपये किमतीची आहे.
- Maharashtra Election 2024 Date : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं, ‘या’ तारखेला होणार मतदान…!
- LIVE TV
- Nandurbar News : ज.ग नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात अक्षय ऊर्जा दिन संपन्न…!
- Nandurbar News : नंदुरबार शहरात पोलिसांची दारू प्रकरणी यशस्वी कारवाई…!
- Nandurbar News : महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आष्टे विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा..!
डॉ. शोभा बाच्छाव यांच्याकडे किती मालमत्ता…
काँग्रेस उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्याकडे ७ लाख ३२ हजार ७४० रूपये, तर त्यांच्या पतीकडे ११ लाख २८ हजार ३२० रूपये रोख आहेत. डॉ. बच्छाव यांच्याकडे १ कोटी १९ लाख २ हजार ८८४ रूपयांची, तर त्यांच्या पतीकडे २ कोटी ७७ लाख ३६ हजार २७२ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांनी गौरव बच्छाव यांच्या प्रतिष्ठानात ५ लाखांची, तर संगीता भालेराव यांच्या प्रतिष्ठानात १० लाख ५ हजारांची गुंतवणूक केली आहे. विविध बँकांमध्ये त्यांच्या मुदती ठेवी आणि बचत आहे. डॉ. शोभा बच्छाव त्यांच्याकडे २६ लाख ९१ हजार ६३८ रुपये किमतीची कार आहे.
डॉ. शोभा बच्छाव यांच्याकडे ३५० ग्रॅम सोने असून, त्याची किमत २१ लाख रूपये आहे. त्यांच्या पतीकडे ९ लाखांचे १५० ग्रॅम सोने आहे. डॉ. शोभा बच्छाव यांच्याकडे पिंपळगाव वखार, मखमलाबाद येथे शेतजमीन आणि नाशिक येथे भूखंड आहे. शिवाय मुंबईतील अंधेरी भागातील लोखंडवाला परिसरात सदनिका आहे. डॉ. बच्छाव यांच्याकडे एकूण १४ कोटी ३२ लाख १० हजार ७९३ रुपयांची, तर त्यांच्या पतीकडे १२ कोटी ३८ लाख ५७ हजार १०९ रूपयांची स्थावर मालमत्ता आहे..
धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे