शिंदखेडा /धुळे १८/७/२३
येथील एम.एच.एस.एस.हायस्कूल व मिराबाई गर्ल्स हायस्कूल या दोन ठिकाणी दहावी रिपीटर विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा सुरु झाली .. या दोन केंद्रावर पहिल्याच मराठी विषयाच्या पेपरला सुमारे शिंदखेडा केंद्रातून तब्बल ४५० विद्यार्थ्यांनी दांडी मारली .. मराठी माध्यमाच्या 718 प्रविष्ट परीक्षार्थीपैकी 450 परीक्षार्थी गैरहजर होते.फक्त 268 विदयार्थीनी परीक्षा दिली तर उर्दू माध्यमाच्या 18 पैकी 16 परीक्षार्थी गैरहजर होते.फक्त 2 विदयार्थीनी परीक्षा दिली.
शिक्षण विभागाच्या वतीने विशेष म्हणजे धुळे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी केलेले प्रयत्न असफल ठरले.
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंगन्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
हे हि वाचा :
Breaking : घरकुल घोटाळ्यातील आरोपींवर कधी होणार कारवाई?..
MLA SATYAJIT TAMBE:नादुरुस्त जि. प. शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत? आमदार तांबेनी घेतली वृत्ताची दखल…
NASHIK :शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा नाशकात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न ..
शिक्षणापासून कुणीही वंचित राहु नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून विदयार्थी पालकांपर्यंत तालुक्यातील शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी परीक्षा फार्म मेहनत घेऊन भरुन घेतले. मात्र मराठी विषयाच्या पहिल्याच पेपर ला विदयार्थी पालकांनि सपसेल पाठ फिरवली असल्याचे दिसुन आले.
आपल्या पाल्यांना शिक्षणापासून वंचित ठेवुन शिक्षणाचे महत्व गांभीर्याने घेतले नाही.असेच म्हणावे लागेल. एवढी उदासिनता पाहिल्यावर शिक्षण विभागाला आश्चर्याचा धक्काच बसलाय तर शहरात सर्वत्र चर्चा रंगु लागली होती.
नेमकं कारण काय कि परीक्षा द्यायला मुले येऊ नयेत ? याचा शोध शिक्षण विभागाला घ्यावा लागणार हे तेवढेच खरे ..
यादवराव सावंत ,प्रतिनिधी ,शिंदखेडा ,एम डी टी व्ही न्यूज