SHOCKING :’ या ‘ शाळेची दुरावस्था, विद्यार्थी जीव धोक्यात ?

0
449

अक्कलकुवा /नंदुरबार : २८/६/२३

भांगरापाणी ता.अक्कलकुवा येथे जीव मुठीत धरून विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेत आहेत.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांमधील इमारती नवीन बांधण्यात आल्या आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेच्या नवीन इमारतीत शिक्षण घेत आहे.
परंतु भांगरापाणी येथील जुन्या जीर्ण झालेल्या इमारती विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरणार आहे. याकडे मात्र, शिक्षण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असून जुन्या जीर्ण इमारती तत्काळ पाडण्याची मागणी होत आहे.काही वर्षांपूर्वी शासनाने सर्व शिक्षा अभिायानंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी कोटी रुपयांचा निधी खर्च करून नवीन शाळेच्या इमारतींचे बांधकाम केले. काही शाळेतील विद्यार्थी नवीन इमारतीत शिक्षणाचे धडे घेत असले तरी भांगरापाणी येथील जिल्हा परिषद शाळेची वर्ग खोल्या अपघाताचा धोका बळावला आहे.

या विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत आहे.जीर्ण खोल्या पडण्याची दाट शक्यता असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका आहे.जुन्या इमारतींचे छत उडाले असून भिंतीही पडल्यात जमा आहेत. भंगार अवस्थेत या जीर्ण खोल्या उभ्या असून साप, विंचू आदी सरपटणाऱ्या प्राण्यांचा मुक्त संचार असतो.काही दिवसांतच पावसाळ्याला सुरूवात होणार असून पावसाने जीर्ण इमारती पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.याप्रकाराबात गावातील नागरिकांनी अनेकदा सरपंच तसेच शिक्षण विभागाला माहिती देऊनही त्यांच्याकडून दुर्लक्ष केल्या गेले. संभाव्य धोका टाळण्यासाठी शिक्षण विभागाने याकडे लक्ष देत तत्काळ जुन्या जीर्ण खोल्या पाडण्यात याव्या, मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.

हे सुध्दा वाचा

बापरे… पुण्यात पुन्हा एका मुलीवर जीवघेणा हल्ला…! | MDTV NEWS

Good News… नंदुरबार पालिकेच्या पाच शाळा झाल्या डिजिटल….! | MDTV NEWS

बापरे … झोपलेला महिलेला बिबट्याने उचलून नेले … तळोदा तालुक्यातील घटना; लचके तोडल्याने महिला गतप्राण | MDTV NEWS

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन |

 WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
जि.प.शाळेचे किचन शेडची देखील अवस्था बिकट आहे. किचनशेडमध्येच पोषण आहार शिजविल्या जाते. आगामी दिवस हे पावसाळयाचे असून पोषण आहारावर माशा बसून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता आहे.याची येथील गटविकास अधिकाऱ्यांना माहिती असूनही दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिक्षण विभागाने याची दखल घेत जीर्ण झालेली जीर्ण खोल्या पडण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.

नितीन गरुड ,तळोदा ग्रामीण प्रतिनिधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here