SHOCKING:बस अभावी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित ..

0
248

शहादा /नंदुरबार -१२/७/२३

Students Protest: शाळेत सोडून द्यायला आणि शाळेतून पुन्हा गावाकडे परत न्यायला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची लालपरी आणि तिची वाट पाहण्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत असल्याचं दाहक वास्तव समोर आले.. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील ही आहेत काही गाव जिथं शाळेत पोचवायला आणि पुन्हा रात्री मुक्कामी जायला शहादा आगाराची लालपरी दोन फेऱ्यावरतीच विद्यार्थ्यांची बोळवण करते.. तालुक्यातील कनसाई नवागाव नादे या गावातील बहुसंख्य आदिवासी ग्रामीण विद्यार्थी शहादा शिक्षण घेण्यासाठी येतात.. आर्थिक परिस्थिती बिकट असून शिक्षणासाठी धावपळ करण्यासाठी सदैव पुढे असतात.. शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शहादा आगाराच्या मर्यादित बसेस या ग्रामीण भागाच्या रस्त्यांवर धावतात.. पण फेऱ्या अगदी मोजक्या असल्याने विद्यार्थ्यांची शाळा महाविद्यालयात पोहोचण्यासाठी चांगली तारांबळ उडताना पाहायला मिळते.. एकदा सकाळी विद्यार्थ्यांना शाळेसाठी घेऊन गेलेली बस थोडासा उशीर झाला तर पुन्हा परत येत नसल्याने पुन्हा शाळेच्या वेळेत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना खाजगी बसेसचा आधार घ्यावा लागतो.. शाळा सुटल्यावर महाविद्यालय सुटल्यावर विद्यार्थ्यांना खिशाला झळ बसवावी लागते..

1
2
3

 WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

आर्थिक झळ बसते आणि खाजगी वाहनांचे पैसे मोजून घरापर्यंत पोहोचावं लागतं. नुकताच आगार प्रमुखांची भेट घेतली असता अगदी मोजक्या बसेस शहादा आगाराकडे असल्याने होणारी गैरसोय समजू शकतो मात्र फेऱ्या वाढवता येणे शक्य नसल्याचं आगार प्रमुखांनी स्पष्ट केलं.. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चिंतेत अधिकच भर पडली आणि त्यात विद्यार्थिनींची संख्या जास्त असल्याने मानव विकास विषयाअंतर्गत बसेस विद्यार्थिनींसाठी चालू कराव्यात जेणेकरून आदिवासी समाजाची ही मुले शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडणार नाहीत.. लवकरात लवकर बसेसच्या फेऱ्या अधिक न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा आदिवासी विद्यार्थ्यांनी दिला आहे..

या संपूर्ण घटनाक्रमाचा आढावा घेतलाय शहादा आगारातून आमचे शहादा प्रतिनिधी संजय मोहिते आणि जगन ठाकरे यांनी.. या आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद देखील संजय मोहिते यांनी साधला आहे.. समस्या जिथे एमडीटीव्ही न्यूज तिथे या चॅनलच्या ब्रीदवाक्याला सार्थ करण्याचं काम संजय मोहिते वारंवार करत असतात.. त्यामुळे एमडीटीव्हीच्या माध्यमातून या विषयाला हात घालण्याचा प्रयत्न आम्ही केलाय..
संजय मोहितेसह जगन ठाकरे एम डी टी व्ही न्यूज शहादा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here