धुपे बु. /भडगाव -११/७/२३
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील तुपे बुद्रुक गाव विकास शब्दापासून कोसो दूर आहे. अंत्यविधीसाठी ग्रामस्थांना प्रेत नेतांना खडतर वाटेतून मार्ग काढत जावं लागत .. आता तर पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे .. त्यामुळे ग्रामस्थांनी आपली नाराजी बोलून दाखवली ..
तसे पाहता धुपे बुद्रुक गाव हे पळसरे धरणाच्या पुनर्वसनातून वसले आहे मात्र शासनाने या गावाचा कुठलाच पुनर्वसन केलेला नाही.
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने पावसाळ्यात जेसीबीच्या साह्याने रस्ता तयार करून अंत्यविधीचा कार्यक्रम कसाबसा पार पडला जातो.. भविष्यात या ठिकाणी स्मशानभूमीसाठी रस्ता तयार करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.. अन्यथा एकही ग्रामस्थांचे दफनविधी क्रिया पार पडणार नसल्याच्या इशाराही धुपे ग्रामस्थांनी व परिसरातील विच खेडा वेले ग्रामस्थांतर्फे देण्यात आलाय .. माजी उपसरपंच बी आर एस कार्यकर्ते दीपक सुनील पाटील यांनी याबाबत कठोर भूमिका घेत ग्रामस्थांच्या पाठीशी उभे राहून प्रत्यक्ष त्या रस्त्याची बिकट स्थिती दाखवली .. आणि वेळ आल्यास आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याचं सांगितलं ..
सतीश पाटील ,भडगाव प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज जळगांव