SHOCKING:नामदेव महाजनांचे रात्रीचे कीर्तन ठरले अखेरचे..

0
293

भडगाव /जळगाव -१४/७/२३

मृत्यूला अंतिम सत्य समजले जाते त्यामुळे मृत्यूं केव्हा, कुठे, कसा, येईल याचे उत्तर कोणाकडे ही नाही मृत्यू यायचाच झाला तर तो कुठेही येऊ शकतो आणि नियतीला मान्य असलेला मृत्यू काळ, वेळ,परिस्थिती आणि वय याची कुठलीच अट न ठेवता झडप घालून चालत्या फिरत्या माणसाला घेऊन जातो आणि तसेच उदाहरण कजगाव येथे मध्यरात्री घडले आहे
याबाबत सविस्तर माहिती अशी की कजगाव येथील रहिवासी नामदेव संतोष महाजन यांनी रात्री सावता महाराज मंदिरात असलेल्या हरिनाम कीर्तन सप्ताच्या कार्यक्रमात टाळकरी म्हणून कीर्तनकार महाराजांच्या बरोबर सहभाग घेतला .. रात्री अकरा वाजेपर्यंत ह.भ.प. सावता महाराज मोहाडीकर, यांचे पहिलेच कीर्तन होते आणि त्यांच्या कीर्तनात महाराजांच्या मागे असलेले नामदेव महाजन यांनी रात्री अकरा वाजेपर्यंत किर्तनांत भजनी मंडळ व टाळकरी सहकाऱ्यांसोबत टाळकरी म्हणून कीर्तनकारांना साथ दिली .. आणि कीर्तन समाप्ती नंतर कार्यक्रम आटोपून रात्री बारा वाजेच्या दरम्यान आपल्या घराकडे गेले .. घरी जाऊन जेवण करून काही वेळ रस्त्यावर पाय मोकळे करण्यासाठी फिरले आणि फिरून घरी आल्यावर रात्री उशीरा त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने गावातील खाजगी डॉक्टरांनी तपासणी केली ..

 WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा. https://bit.ly/3UoK7E0
व पुढील उपचारासाठी त्यांना चाळीसगाव येथे नेण्यात आले व तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले..
आणि अवघ्या दोनच तासांत होत्याचे नव्हते झाले .. त्यांच्या मृत्यूने अनेकांना धक्काच बसला .. नेहमी कीर्तनात टाळकरी म्हणून सहभाग घेणाऱ्या महाजन यांच्या मृत्यूने कजगाव परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे .. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी, सून,नातवंडे असा परिवार आहे.. मंगळवारी दुपारी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले
सतीश पाटील ,भडगाव प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज जळगाव ….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here