Shocking News: वीज गेली तर गेली , ‘ हेही ‘ बंद : ग्राहक संतप्त ..

0
469

नेर /धुळे -२१/६/२३

साक्री तालुक्यातील म्हसदी येथे सेंट्रल बँक ऑफ इंडियाची शाखा असून, या शाखेत शुक्रवारी सकाळपासून वीजपुरवठा खंडित [Shocking ]झाला. परिणामी बँकेतील कामकाजही ठप्प झाले होते. यामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांना माघारी परतावे लागले. दरम्यान, बँक प्रशासनातर्फे बँकेत जनरेटरची व्यवस्था करण्यात आली नसल्याचे सांगत, ग्राहकांनी बँक प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

गेल्या अनेक वर्षांपासून म्हसदी येथे सेंट्रल बैंक ऑफ इंडियातर्फे शाखा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील वसमार, धमनार, बेहडे, विटाई, काळगाव, भडगाव, ककाणी, राजबाई शेवाळी, चिंचखेडा या गावातील खातेधारकांची दिवसभर बँकेत वर्दळ असते. या गावातील नागरिकांचे सर्व व्यवहार याच बँकेतून होत असतात. त्यामुळे दररोज या शाखेमार्फत लाखोंची उलाढाल होत असते.

या बँकेत शेतकरी, विविध योजनांच्या लाभार्थ्यांची संख्या अधिक असल्याने, तसेच सध्या खरीप हंगाम सुरू झाल्याने, पैसे काढण्यासाठी शेतकरी बांधवांची सकाळपासून बँकेत गर्दी होत आहे. मात्र, शुक्रवारी व शनिवारीदेखील महावितरणचा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे परिणामी बँकेतील कामकाजावरही परिणाम होऊन, सर्व व्यवहार ठप्प झाले होते.

ग्राहकांचा बँक प्रशासनावर संताप…
शेतकऱ्यांना बियाणे घेण्यासाठी पैशांची आवश्यकता असल्याने शेतकरी सकाळपासून बँकेत रांग लावत आहेत. मात्र या शाखेत विजेअभावी दोन दिवसांपासून व्यवहार ठप्प असल्यामुळे खातेधारकांची कामे खोळंबली आहेत. किरकोळ कामासाठीदेखील पूर्ण दिवस थांबावे लागत आहे. शेतकरी खातेधारकांना याचा मोठा फटका बसत आहे. मात्र, या बँकेच्या शाखेमध्ये पर्यायी व्यवस्था म्हणून जनरेटरही बसविण्यात आले नसल्याने, ग्राहकांनी बँक प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला.

हे सुध्दा वाचा

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

ACB Trap … नंदुरबार पं.स.चे विस्तार अधिकरी जाळ्यात ! | MDTV NEWS

नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… | MDTV NEWS

म्हसावद पोलिसांनी रोखला पिप्राणी येथील बालविवाह ! |

”वीजपुरवठा खंडित झाल्यावर, आमच्याकडे पर्यायी व्यवस्था म्हणून इन्व्हर्टर उपलब्ध आहे. मात्र, इन्व्हर्टरची मर्यादा फक्त तीन तासांची असते. शुक्रवारी आणि शनिवारी अकरा वाजेपासून तर पाच वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित झाल्याने, खातेधारकांचे प्रचंड हाल झाले. यासाठी विद्युत वितरण कंपनीने सकाळी अकरा वाजेपासून तर दुपारी चारपर्यंत वीजपुरवठा सुरु ठेवावा, अशी ग्राहकांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो.”
-प्रशांत जोशी, शाखा अधिकारी, म्हसदी.

दिलीप साळुंखे ,एम डी टी व्ही न्यूज प्रतिनिधी ,नेर/धुळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here