SHOCKING:बिबट्याची दहशत.. अन चढवला हल्ला .. भीतीच वातावरण..

0
312

धमणार /धुळे -१३/७/२३

साक्री तालुक्यातील धमनार गावाजवळ असलेला आमराळी शिवारात बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. धमणार येथील आमराळी शिवारात मंगळवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने गोऱ्हावर हल्ला केला.त्यात शेतकरी धीरज गुलाबराव सोनवणे, यांच्या दोन वर्षाचा गोऱ्हा मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली असून नागरिक व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे सद्यस्थितीत शेतकऱ्यांना खरीप हंगामाची पेरणी व पिकांच्या संरक्षणासाठी शेतात जाणे येणे गरजेचे आहे.

 WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
शेतकरी धीरज सोनवणे, हे पहाटे डाळिंब पिकांची फळधारणा केलेली आहे. वन्य प्राणी रानडुक्कर यांचा उपद्रव्य आहे. म्हणून पिकांच्या संरक्षणासाठी पहाटे शेतात गेले असता त्यांना गोऱ्हाला गोठ्यापासून पाचशे मीटर अंतरावर डाळिंबाच्या शेतामध्ये फरफडत नेले. बिबट्याने गोऱ्हावर हल्ला चढवून फस्त करून ठार केले होते. सदर या घटनेची माहिती वनविभागास दिली. पिंपळनेर वनपरिक्षेत्र आधिकारी डी. आर. अडकीने,यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसदी वनपाल डी.पि.पगारे, वन कर्मचारी रमेश बच्छाव, यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची पाहणी करून पंचनामा केला. त्या शेतकऱ्याला आर्थिक मदत दिली जाईल असे सांगितले.या परिसरात बिबट्याचा संसार असून बिबट्याचे दर्शन शेतकऱ्यांना झाले आहेत. त्यामुळे या परिसरात शेतकरी दहशतवादी खाली वावरत आहेत. वन विभागाकडून बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गाकडून होत आहे

दिलीप साळुंखे ,धुळे प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here