राज्यस्तरीय कराटे स्पर्धेतील ठरला कांस्य पदकाचा मानकरी श्रेयससिंग परदेशी..

0
230

तळोदा : ०५/३/२०२३

मूळ रहिवासी तळोदा येथील आणि जळगाव येथे वास्तव्यास असलेल्या श्रेयस परदेशी यांन आपली कराटे स्पर्धेत कामगिरी दाखवली..

पुणे येथील बारामती येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत कुमार श्रेयस महेंद्र परदेशी याने आपली चमक दाखवली..

या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमान करण्यात आलं होतं..

01

19 वर्षाखालील वयोगटात त्यांना कास्यपदक पटकवून तृतीय क्रमांक मिळवला..

कुमार श्रेयस याला राजेंद्र जंजाळे अश्विनी निकम आणि कोमल पाटील या प्रशिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं होतं ..

विभागीय स्तरावर नाशिक येथे झालेल्या स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकावलं होतं..

हे हि पहा : नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची वार्षिक तपासणी संपन्न

https://mdtvnews.in/nandurbar-district-police-completes-annual-inspection/

जळगाव जिल्हा पोलीस प्रमुख एम राजकुमार आणि अतिरिक्त पोलीस प्रमुख चंद्रकांत गवळी यांनी त्याच्या या यशाबद्दल त्याचं कौतुक केलंय.

श्रेयस हा जळगाव शहर पोलीस अंमलदार सविता परदेशी आणि अभियंता महेंद्र परदेशी यांचा चिरंजीव आहे.

तळोदा शिवसेना शहर प्रमुख जगदीश परदेशी प्राध्यापक परदेशी यांचा तो पुतण्या आहे..

त्याने मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल तळोद्यासह जळगावातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय..
महेंद्र सूर्यवंशी एम.डी. टी.व्ही न्यूज प्रतिनिधी तळोदा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here