सिकलसेल : बभळाज येथे जनजागृती रॅली व तपासणी शिबीर

0
253

शिरपूर :- तालुक्यातील होळनांथे प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत असलेल्या बभळाज उपकेंद्रात आज दि. १९ जून रोजी जागतिक सिकलसेल दिनानिमित्त आजाराबाबत समुपदेशन व आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ.लखन महाजन यांच्या उपस्थितीत गावातून जनजागृती रॅली काढण्यात आली. सिकलसेल आजाराबाबत जनजागृती व्हावी म्हणुन पोस्टरद्वारे संदेश देण्यात आले. यासाठी रॅलीत जिल्हा परिषद मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

1f253378 e572 4458 b438 ae9d1636b733

आनुवंशिक असलेला सिकलसेल हा आजार रक्तपेशीशी संबंधित आहे. आई किंवा वडील या रोगाने पीडित किंवा रोगाचे वाहक असतील तर हा रोग एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जातो. गर्भधारणेच्या वेळीच रक्तातील हिमोग्लोबीनच्या रचनेत बदल होऊन रक्तातील गोल लाल पेशी कोयत्याच्या आकाराच्या होतात. कोयत्याला इंग्रजीत ‘सिकल’असे म्हणतात. त्यामुळेच या आजाराचे नाव सिकलसेल असे आहे.

हे सुध्दा वाचा

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

ACB Trap … नंदुरबार पं.स.चे विस्तार अधिकरी जाळ्यात ! | MDTV NEWS

फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरत असाल तर … – MDTV NEWS

म्हसावद पोलिसांनी रोखला पिप्राणी येथील बालविवाह ! | MDTV NEW

या रोगाने ग्रस्त झालेल्या रुग्णांच्या हातापायांवर सूज येते ते खूप दुखतात, सांधे सुजतात व दुखतात, तीव्र वेदना होतात. सर्दी-खोकला वाढतो, अंगात सातत्याने बारीक ताप राहतो, लवकर थकवा येतो, चेहऱ्यावर अजिबात तेज दिसत नाही. डोळ्यांत पिवळसरपणा दिसतो. हिमोग्लोबीनचे प्रमाण सहा टक्क्यांपेक्षा कमी असते. त्यामुळे रुग्णाला बाहेरून रक्त द्यावे लागते. रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊन तो अशक्त होतो. बऱ्याच रुग्णाला कावीळ होतो. शरीरात प्राणवायूच्या कमतरतेमुळे रुग्णाला तीव्र वेदना होतात.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

या रोगावर रामबाण उपाय अद्यापही सापडलेला नाही. मात्र, रोगाची लक्षणे आढळल्यानंतर उपाययोजना करता येऊ शकते. त्यामध्ये या रोगामुळे रक्तपेशी कमी झालेल्या रुग्णाला बाहेरून रक्तपुरवठा केला जातो. या रोगावर काही जनुकीय उपचार करता येतात का, यावर संशोधन सुरु आहे. रुग्णांनी दररोज फॉलिक अ‍ॅसिड ही व्हिटॅमिनची गोळी घ्यावी. त्यामुळे लाल रक्तपेशी बनवण्यास मदत होते. नवजात रुग्णांना वयाच्या सहा वर्षांपर्यंत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पेनिसिलीन द्यावी लागते. अ‍ॅन्टिबायोटिक औषध संसर्गजन्य रोगाच्या बचावासाठी देण्यात येते. रुग्णानी भरपूर पाणी प्यावे, अति थंडी आणि गरमीपासून स्वत:चा बचाव करावा, शारीरिक कष्ट कमी आणि मानसिक ताण घेऊ नये, अशी माहिती यावेळी डॉ. महाजन यांनी दिली.

हे सुध्दा वाचा

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

ACB Trap … नंदुरबार पं.स.चे विस्तार अधिकरी जाळ्यात ! | MDTV NEWS

फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरत असाल तर … – MDTV NEWS

म्हसावद पोलिसांनी रोखला पिप्राणी येथील बालविवाह ! | MDTV NEW

याप्रसंगी बभळाज आरोग्य उपकेंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. महाजन, आरोग्य सहाय्यक पी.जे.सोनवणे, आरोग्य सेविका एम.एम. गोंडर, आरोग्य सेवक फारुख शेख, जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक वासुदेव चाचरे, रंजना पवार, रमीला पवार, भारती पवार यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

राज जाधव. एमडी. टीव्ही. न्यूज शिरपूर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here