Dhule News: धुळेमध्ये 52 लाख रुपयांच्या गुटख्याची तस्करी पकडली | Smuggling of gutka caught in Dhule

0
577
Smuggling of gutka

Dhule News : धुळे जिल्ह्यातील सांगवी पोलिसांनी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर 52 लाख रुपयांच्या सुगंधित तंबाखू आणि पानमसाला जप्त केला. या कारवाईत चालकाला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक निरीक्षक जयेश खलाणे यांना महामार्गावर पानमसाला आणि सुगंधी तंबाखूची अवैधरीत्या वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी सहकाऱ्यांसह हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर नाकेबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली.

download

मध्य प्रदेशाकडून महाराष्ट्रात येणाऱ्या ट्रक (केए १०, ए ६९५६)ला थांबवून पोलिसांनी चौकशी केली असता चालकाने वाहनामध्ये रवा आणि मैदा असून, त्याची वाहतूक करीत असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी संशयावरून वाहनाची झडती घेतली असता मैदा आणि रवा भरलेल्या गोण्यांखाली दडवलेल्या सुगंधित पानमसाला व तंबाखूच्या गोण्या आढळल्या.

पोलिसांनी ट्रक जप्त करून सांगवी पोलिस ठाण्यात नेला. तेथे झडती घेतल्यावर पानमसाला, सुगंधित तंबाखू व सुगंधी सुपारी आढळली. गुटख्याची किंमत 51 लाख 77 हजार 190 रुपये असून, 30 लाख रुपये किमतीच्या ट्रकसह एकूण 81 लाख 77 हजार 190 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चालक सुरेश एन. वेलुथिरा (वय 31, रा. नेथरापुंझा, केरळ) याला अटक करण्यात आली.

अन्न व औषध अधिकारी किशोर बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here