नंदुरबार -४/६/२३
शहादा शहरात शांतता भंग करण्यासाठी व नियोजित दंगल घडविण्याचा कट कारस्थान करणाऱ्या समाज कंटकांचा बंदोबस्त करुन कारवाई करण्यात यावी अशी मागणी पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्याकडे करण्यात आली
क्रांतीचौक येथील रहिवासी ,शहरातील तमाम हिंदू बंधू-भगिनी यांच्या वतीने आमदार राजेश पाडवी यांनी अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्याकडे निवेदनाद्वारे हि मागणी केली आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
आशय असा :
2 तारखेला शुक्रवारी सायंकाळी सात वाजता क्रिकेट खेळण्यावरुन गांधी नगर येथे किरकोळ वाद झाल्याचे निमित्त होवून गांधीनगर व क्रांती चौक येथे एका समाजाच्या लोकांनी रात्री १० वाजेच्या सुमारास अचानक मोठ्या संख्येने मोटारसाईकल वरुन लोकांना गोळा केले
हातात काठ्या, दांडके घेवून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ व घोषणाबाजी करीत दहशत निर्माण केली.
परिसरात दहशत निर्माण व्हावी या दृष्टीने सदरचा प्रकार हा पुर्वनियोजित असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
समाजकंटकांनी गांधीनगर व क्रांती चौक या भागात धुडघुस घालत दहशत निर्माण केली.
हा सर्व प्रकार भयंकर असून साधारण क्रिकेटच्या वादातून क्षणभरात ३०० लोकांचा जमाव जमा होऊन दहशत निर्माण होते. असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनाची दखल घेऊन दंगलखोरांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी अन्यथा तालुक्यातील समस्त हिंदू समाजातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे .
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील,डॉ. वसंत पाटील, अजय शर्मा यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी निवेदनावर राजेंद्र साळी, तुषार पाटील, यशवंत चौधरी, डॉ. किशोर पाटील, दिनेश खंडेलवाल, अजय शर्मा ,देविदास चौधरी आदींसह अनेकांच्या सह्या आहेत.
रईसखान मुक्तारखान बागवान याचा भाऊ इद्रिस बागवान हा शहरातील गांधी उद्यान जवळील रस्त्याने जात असतान आठ ते दहा जणांनी थांबून अपमानकारक शब्द वापरले त्यामुळे इद्रिस याने असे बोलू नकाअसे सांगितल्याचा राग येऊन शुभम जवेरी ,जगदीश बोरदेकर, विकी तांबोळी ,चेतन चौधरी ,गुड्डू पवार ,महेश पाटील, भूपेंद्र चौधरी, पंकज चौधरी, जग्गू न्हावी ,राजू भोई, व पिरी (पूर्ण नाव माहित नाही) यांनी इद्रिस बागवान रईस बागवान व अक्तर बागवान या तिघांना बेदम मारहाण केली
या मारहाणीत तिघेजण जखमी झाले आहेत ही घटना गावात पसरतात शहरात तणाव निर्माण झाला
रईखान मुक्ताखान बागवान यांच्या फिर्यादीवरून वरील तीनही संशोतांविरोधात कलम 307 व कलम 341 143 147 148 149 दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार करीत आहेत
यातील पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित संशयितांचा शोध घेत आहेत.
संजय मोहिते, शहादा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज