नंदुरबार :२२/३/२३
ज्या गावाच्या नावातच पाणी आहे त्या गावातील लोकांनी स्वातंत्र्याची 7 दशके ओलांडल्यानंतर नळाला पाणी पाहिलं.
रस्ता, वीज, शाळा, आरोग्य सेवा आदी सारख्या मूलभूत सेवा देखील ज्या गावात पोहोचण्यासाठी 70 वर्षे प्रतीक्षा करावी लागली.
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेलं …
अतिशय दुर्गम भागातील शेवटचं असणाऱ्या धजापाणी गावची ही व्यथा आहे.
आता या गावातील एका वनमजुराच्या मुलाने राज्यसेवा परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे.
परिस्थितीवर मात करत डॉ. अर्जुन पावरा हे राज्यात अनुसूचित जमाती प्रवर्गातून पहिले आले आहेत.
डॉ. अर्जुन पावरा यांचं मुळ गाव सातपुड्याच्या कुशीतील धजापाणी हे आहे.
गावात कोणत्याही सुविधा नाहीत. हे गाव मालदा ग्रामपंचायत अंतर्गत येते.
अत्यंत दूर्गम भाग असल्याने मुलभूत सुविधांची वाणवा आहे.
वडील वनमजूर असले तरी त्यांनी मुलांना शिकवलं.
अर्जुन यांचं दहावी पर्यंतचं शिक्षण शिरपूरला झालं.
दहावी नंतर शिरपूर येथूनच विज्ञान शाखेतून बारावी केली.
त्यानंतर मुंबईतील सायन येथील आयुर्वेदिक महाविद्यालयातून बीएएमएसची पदवी मिळवली.
बीएएमएस पदवी मिळवल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली.
दरम्यानच्या काळात गावातील प्रश्न, मूलभूत हक्क, तेथील लोकांच्या समस्या यांचा विचार सातत्याने मनात येत होता. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात मन रमत नव्हतं.
सोबतचे सहकारी मित्र MPSC परीक्षेची तयारी करत होते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होऊन लोकांच्या समस्या सोडवाव्यात असा विचार मनात येऊ लागला.
म्हणून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. याला घरच्यांनीही प्रतिसाद देत सहकार्य केले, असे डॉ. पावरा सांगतात.
मंत्रालयात कक्ष अधिकारी 2017 पासून एमपीएससीची तयारी सुरू केली
आणि सुरवातीच्या काळात पुस्तक, अभ्यास हेच जीवन म्हणून स्वतःला झोकून दिले. 2-3 फेरीत अपयश हाती आले.
मात्र त्यावर खचून न जाता प्रयत्न सुरूच ठेवले.
अखेर 2020 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत यश मिळालं.
त्यांनी अनुसूचीत जमाती प्रवर्गातून राज्यातून द्वितीय क्रमांक मिळवला.
मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
उपजिल्हाधिकारी व्हायचं स्वप्न करण्याची संधी मिळाली. मात्र, मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून काम उपजिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न होतं.
म्हणून 2021 मध्ये पुन्हा राज्यसेवा परीक्षा दिली.
यामध्ये पुन्हा एकदा घवघवीत यश मिळालं. डॉ. अर्जुन पावरा हे यंदा अनुसूचित जमाती प्रवर्गातून राज्यात पहिले आले आहेत.
राज्यसेवा परीक्षेतील हा निकाल
माझ्यासाठी अतिशय आनंददायी असून माझ्या कष्टाचं सार्थक झाल्याच्या भावना आहे.
आगामी काळात मला उपजिल्हाधिकारी म्हणून पद मिळण्याची संभावना आहे,अशी माहिती डॉ. अर्जुन पावरा यांनी दिली.
डॉ. पावरा यांचा हा प्रवास राज्यातील प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
सलाम या वनमजुराच्या मुलाला आणि त्याच्या जिद्दीला .. एम डी टी व्ही न्यूज परिवाराकडून भावी वाटचालीस या काव्यात्मक ओळीत शुभेच्छा !
”उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी,
नजरेत सदा नवी दिशा असावी,
घरट्याचे काय आहे बांधता येईल केव्हा ही,
क्षितीजांच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी…….!”
प्रविण चव्हाण ,एम. डी. टी.व्ही न्यूज, नंदुरबार.