११ वी १२ वी विज्ञान शाखा – मागासवर्गीय विद्यार्थ्यांनाजात वैधता प्रमाणपत्रसाठी विशेष मोहीम

0
124

नंदुरबार -१२/४/२३

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत १ एप्रिल ते 30 एप्रिल २०२३ या कालावधीत ” सामाजिक समता पर्व अभियान राबविण्यात येत असून याअंतर्गत समाजकल्याण आयुक्त पुणे व महासंचालक, बार्टी पुणे यांच्या निर्देशानुसार राज्यातील इयत्ता ११ वी १२ वी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य राकेश पाटील यांनी कळविले आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्णमाहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.https://bit.ly/3UoK7E0

या कालावधीत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात नंदुरबार जिल्ह्यातील इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, पशुसंवर्धन, वास्तुशास्त्र, फॉर्मसी, विधी इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमास आरक्षित जागेवर प्रवेश घेण्यासाठी सदर अभ्यासक्रमाची शिक्षण फीची प्रतीपूर्ती करण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते.
तसेच तंत्रनिकेतन अभ्यासक्रमात प्रथम, व्दितीय व तृत्तीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग या मागास प्रवर्गातील अद्याप समितीकडे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज ऑनलाईन भरलेले नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाईन अर्ज..https://bartievalidity.maharashtra.gov.in/

या संकेतस्थळावर सर्व मुळ कागदपत्र अपलोड करुन व अर्ज भरुन ते अर्ज अपलोड केलेल्या सर्व मुळ कागदपत्रांच्या सत्यप्रतीसह व मुळ शपथपत्रांसह (Hard Copy) जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नंदुरबारच्या “नागरी सुविधा केंद्र ” येथे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत जमा करावेत.

अर्जदारानी अर्ज भरतांना स्वतःचा ईमेल व मोबाईल क्रमांकाव्दारेच अर्ज नोंदणी करावा. समितीने त्यांच्या प्रकरणावर निर्णय घेतल्यानंतर निर्णय/जात वैधता प्रमाणपत्र हे त्यांनी नोंदणी केलेल्या ईमेलवर प्राप्त होत असते. आपला युझर आयडी व पासवर्ड व्यवस्थित जतन करुन ठेवण्यात यावा, असे आवाहनही जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य श्री. पाटील यांनी केले आहे.

एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here