प्रकाशानजीक भरधाव ट्रकची मिनी ट्रकला धडक ; तीनजण ठार

0
1179

नंदुरबार :- शहादा तालुक्यातील दक्षिणकाशी प्रकाशा नजीकच्या विसरवाडी-सेंधवा राष्ट्रीय महामार्गावरील कोकणमाता मंदिराजवळ भरधाव वेगातील ट्रकने छोटा हत्तीला ( मिनी ट्रक ) समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीनजण जागीच ठार झाल्याची घटना काल रविवारी घडली. या अपघातात दोनजण गंभीर जखमी झाले असून त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली व पोलीस कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. जखमींना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

24b6c4c4 0f28 441c 9434 76766debcec5

याबाबत सविस्तर वृत्त असे की, छोटा मिनी ट्रक क्रमांक (एमपी.०९- एचएच.५५११ ) मध्यप्रदेशातून गुजरात राज्यात लग्न समारंभासाठी लागणारे साहित्य तसेच धान्य घेऊन जात असतांना प्रकाशा गावाजवळ समोरून गुजरात राज्यातून मध्यप्रदेशकडे भरधाव वेगाने जाणारा ट्रक ( क्रमांक जीजे.५ – बीएक्स.४४८३ ) ने जोरदार धडक दिली.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

या अपघातात मिनीट्रक मध्ये चालकसह एकूण पाच जण होते. त्यापैकी तीन जागीच ठार झालेत तर अन्य दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. अपघात एवढा मोठा भीषण होता की कानठळ्या बसवणारा आवाज झाला होता.त्यात मिनी ट्रकचा पूर्णतः चक्काचूर झाला आहे. छोटा मिनी ट्रक अक्षरशः मालट्रकच्या पुढील भागात घुसलेला होता. प्रकाशा पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली. जेसीबी यंत्राच्या साह्याने ट्रकमध्ये अडकलेल्या मिनी ट्रकला बाहेर काढावे लागले, अशी परिस्थिती होती.

अपघातस्थळी रक्ताच्या सडा पडलेला होता. मिनी ट्रक मधील सर्व साहित्य रस्त्यावर अस्ताव्यस्त पडले होते. जखमींना मदत करण्यासाठी प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राचे संदीप खंदारे व रामा वळवी तसेच जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, सुरेश पाटील यांच्यासह स्थानिक पत्रकार व ग्रामस्थांनी मदत केली. अपघातानंतर ट्रक चालक व सहचालक दोघेही फरार झालेले आहेत.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

अपघातात हेमराज अंजने (वय ३९, रा. सुरत ), मनोज घाट्या (वय ४२, रा. सुरत ) व भगवानभाई गोविंद पंचुले (वय ४८ रा. गोंदिया, मध्यप्रदेश ) हे तिघे जागीच ठार झाले आहेत. शहादा ग्रामीण रुग्णालयात डॉ. गोविंद शेल्टे, डॉ. लक्ष्मीकांत साठे व डॉ. सत्यानंद पाटील यांनी शविच्छेदन करून शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. अपघातात मिनी ट्रक चालक गोलूभाई व अनिकेत (दोघे रा.हिरापूर, मध्यप्रदेश ) हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केलेले आहेत.

घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, प्रभारी पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी भेट दिली. शहादा पोलिसात अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. पुढील तपास प्रकाशा पोलीस दुरक्षेत्राचे संदीप खंदारे करीत आहेत.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here