तळोद्यात भरधाव वाहनाची दुचाकीला धडक

0
203

नंदुरबार :- तळोदा-अक्कलकुवा रस्त्यावरील बुधावली गावाजवळ भरधाव वेगातील वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाला. अपघातानंतर वाहनचालक घटना स्थळावरून पळून गेला. तळोदा पोलिसात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाशा येथील रोहन हेमंत मुसळे हे दुचाकीने (क्र.एम.एच.३९ एएच ३९०७) तळोदा-अक्कलकुवा रस्त्याने जात होते. यावेळी समोरून भरधाव वेगात येणाऱ्या एका चारचाकी वाहनाने बुधावली गावाजवळ दुचाकीला धडक दिली. या अपघातात रोहन मुसळे यांना गंभीर दुखापत झाली आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

तसेच आघातात दुचाकीचेही नुकसान झाले. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबबात आदित्य हेमंत मुसळे यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागुल करीत आहेत.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here