मुंबई -१०/७/२३
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं आपल्या आयुष्यातील नव्या इंनिंगची तयारी सुरु केली आहे. आपल्या ‘धोनी एंटरटेन्मेंट’ या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली तो लवकरच चित्रपट निर्मितीमध्ये उतरणार आहे. त्याची सुरुवात एका तामिळ चित्रपटाने होणार आहे. ‘अथर्व – द ओरिजिन’चे लेखक रमेश थमिलमणी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. धोनीच्या प्रॉडक्शन हाऊसनं हेही जाहीर केलंय की ते देशभरातील अनेक भाषांमध्ये चित्रपट निर्मिती करणार आहेत. तामिळशिवाय धोनीचं प्रोडक्शन हाऊस सस्पेन्स थ्रिलर, क्राईम, विज्ञानकथा आणि इतर अनेक विषयांचे चित्रपट आणणार आहे. त्यासाठी अनेक चित्रपट निर्माते आणि पटकथा लेखकांशी सध्या चर्चा सुरु आहे.
संकल्पना साक्षी धोनीची-
धोनीचं प्रोडक्शन हाऊस जो तामिळ चित्रपट बनवणार आहे त्याची संकल्पना साक्षी धोनीची आहे. हा चित्रपट एक फॅमिली ड्रामा असेल. चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांची नावं नंतर जाहीर केली जाणार आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारलेल्या थमिलमणी यांनी सांगितलंय की, ‘या चित्रपटाबाबतची साक्षीची संकल्पना मी वाचली आहे. हे खरोखर विशेष आहे. ही एक पूर्णपणे नवीन संकल्पना आहे आणि या संकल्पनेवर संपूर्ण फॅमिली ड्रामा फिल्म बनण्याची पूर्ण क्षमता आहे.’
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
तामिळनाडूशी धोनीचं अनोखं नातं-
धोनीच्या प्रॉडक्शन हाऊसनं नुकतंच एक निवेदन जारी केलं आहे. प्रॉडक्शन हाऊसनं जारी केलेल्या या निवेदनात म्हटलंय की, ‘धोनीचं तामिळनाडूच्या लोकांशी खास नातं आहे. अशा परिस्थितीत तामिळ भाषेत त्याचा पहिला चित्रपट बनवून त्याला हे खास नातं त्याला आणखी घट्ट करायचं आहे.’
तुम्हाला माहितच असेल की चेन्नई सुपर किंग्स या टीमचा धोनी कॅप्टन आहे. त्यानं चेन्नईला आतापर्यंत 4 वेळा विजेतेपद जिंकून दिलं आहे. त्यामुळे तामिळभाषिक आणि तामिळनाडूबद्दल त्याचं विशेष प्रेम आहे.
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,मुंबई