दिल्लीचा सलग तिसरा पराभव! राजस्थान रॉयल्सचा दणदणीत विजय..

0
120

मुंबई – ९/४/२३

जगप्रसिद्ध आयपीएल 2023  ला सुरुवात झाली असून यातील11 वा सामना हा राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात राजस्थानने दिल्लीचा पराभव केला आहे.

आयपीएल 2023 मधील दिल्ली कॅपिटल्सचा हा सलग तिसरा पराभव असून यामुळे सोशल मीडियावर दिल्लीचा संघ ट्रोल होताना दिसत आहे.

या सामन्यात सुरुवातीला दिल्लीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल आणि जॉस बटलर हे दोघे ओपनिंग बॅट्समन म्हणून मैदानात उतरले. यशस्वीने पुन्हा एकदा संघासाठी चांगली कामगिरी केली. यशस्वीने 31 बॉलमध्ये 60 धावा केल्या. तर जॉस बटलरने 51 चेंडूत 79 धावा केल्या.

परंतु 9 व्या ओव्हरमध्ये यशस्वीची विकेट पडली.

आता WhatsApp वरमिळवाब्रेकिंगन्यूज, जॉबअपडेट्सआणिमहत्वपूर्णमाहिती! त्यासाठीक्लिककराआणिजॉईनकरा. https://bit.ly/36S6BFu

यानंतर फलंदाजांमधून केवळ हेटमेयरच राजस्थानसाठी 39 धावांची कामगिरी करू शकला. इतर कोणत्याही बॅट्समनला दोन अंकी धाव संख्या करता आली नाही.

तर दिल्ली कडून मुकेश यादवने 2 तर कुलदीप यादव आणि रोव्हमन पॉवेलने प्रत्येकी 1 धावा केल्या.

राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स घालून 199 धावा केल्या.

दिल्ली कॅपिटल्स समोर विजयासाठी 198 धावांच आव्हान असताना दिल्लीच्या फलंदाजीची सुरुवात खराब झाली.

पहिल्याच ओव्हरमध्ये पृथ्वी शॉ आणि मनिष पांडे हे दोघे शून्य धावांवर बाद झाले.

त्यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नरने संघाची बाजू सावरली. त्याने 55 बॉलमध्ये 65 धावा केल्या.

याशिवाय केवळ ललित यादवने 24 चेंडूत 38 धावांची कामगिरी केली. इतर कोणत्याही बॅट्समनला राजस्थानच्या गोलंदाजांनी फार काळ मैदानात टिकू दिले नाही.

अखेर दिल्ली कॅपिटल्स केवळ 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स घालवून 142 धावांपर्यंतच मजल मारू शकली आणि राजस्थान  संघाचा 57 धावांनी विजय झाला.

एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here