रोहित शर्मा : सोशल मीडियावर ट्रोल..

0
186

मुंबई – १०/५/२३

आयपीएलमध्ये प्लेऑफसाठी सामने रंगात आले आहेत. आतापर्यंत झालेल्या 10 सामन्यांमध्ये टीम इंडियाचा हिटमॅन समजला जाणारा रोहित शर्मा मात्र आयपीएलमध्ये वाईट फॉर्ममध्ये खेळताना दिसला आहे. त्यावरून रोहित शर्माला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. रोहित शर्माला हिटमॅन म्हणतात मात्र त्याचा परफॉर्मन्स पुअर मॅनसारखा चालू असल्याची टीका सोशल मीडियावर केली जात आहे.

मुंबई इंडियन्सचा (MI) कर्णधार रोहित शर्मा सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) हंगामात एक कठीण स्थितीमधून जात आहे. आतापर्यंतच्या 10 सामन्यांमध्ये रोहितने 18.40 च्या सरासरीने आणि एका अर्धशतकासह 126.89 च्या स्ट्राइक रेटने 184 धावा केल्या आहेत.

भारतीय क्रिकेटचे दिग्गज सुनील गावस्कर यांनी शर्माला पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलसाठी स्वत:ला तंदुरुस्त आणि फ्रेश ठेवण्यासाठी ब्रेक घेण्याचा सल्ला दिला आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0

MI अष्टपैलू कॅमेरून ग्रीनने सोमवारी (8 मे) आपल्या कर्णधाराच्या फॉर्मबद्दलची चिंता व्यक्त केली. यावेळी बोलताना त्याने रोहितबाबत एक मोठ वक्तव्य केलं. कॅमरुनला रोहित शर्माच्या वाईट फॉर्मबद्दल प्रश्न विचारला असता त्याने जे उत्तर दिलं त्यामुळे सध्या तो चर्चेत आहे.

रोहितने मुंबई आणि टीमसाठी जे केलं ते आम्ही पाहिलं आहे, आम्ही त्याच्या पाठीशी आहोत. तो कधीही फॉर्ममध्ये येऊ शकतो.

त्याने काही सामन्यांमध्ये खूप उत्तम फलंदाजी केली आहे. त्याने सुरुवातीला खूप चांगला टेम्पो मेंटेन केला होता, तो अजूनही चांगला खेळू शकतो आणि आम्ही त्याला पूर्णपणे पाठिंबा देत आहोत.”

कॅमरुन ग्रीनला मुंबई टीमने 17.50 कोटी रुपयांना टीममध्ये घेतलं.

तो सर्वात महागडा खेळाडू म्हणून ओळखला जातो.

आता त्यानेच रोहित शर्माला पाठिंबा दिल्याने आणखीन कॅमरुन चर्चेत आला आहे. वाईट फॉर्ममुळे सध्या रोहित शर्मावर टीका केली जात आहे.

एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here