दिल्ली : १५/६/२३
क्रिकेटचं मैदान असो, हॉकीचं ग्राउंड असो की मग फुटबॉलचं ग्राउंड नेहमीच काही ना काही मजेशीर आणि सुखद घटना घडतच असतात. त्यात खेळाडूंची सेलीब्रेशन करण्याची पद्धत निराळीच असते. कोणी उड्या मारून तर कोणी मैदानभर धावून किंवा कोण चक्क टी-शर्ट काढून सेलिब्रेशन करत असतात. फ़ुटबॉलच्या मैदानातही असंच काहीसं घडत असतं. पण भारताच्या स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीनं गोल केल्याचं असं काही सेलिब्रेशन केलं आहे की त्याच्या चाहत्यांना सुखद धक्काच बसला आहे.
सध्या इंटरकॉन्टिनेंटल चषक 2023 सुरु आहे. यामध्ये भारत विरुद्ध वानुआतू हा सामना सुरु होता. या सामन्यादरम्यान सुनील छेत्रीनं गोल केला. पण त्यानंतरचं त्याच सेलिब्रेशन हे एक गुड न्यूज देणारं होतं. ते बघून मैदानात असलेली त्याची पत्नीही उठून टाळ्या वाजवू लागली.
हे सुध्दा वाचा
अजितदादा पवार नंदुरबारात … मेळाव्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन – MDTV NEWS
नंदुरबारात ९ वर्षात विकासाला गती : कोट्यवधींची कामे – MDTV NEWS
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
सुनील छेत्री झाला प्रेग्नेंट
या सामन्यात सुनीलनं गोल केल्यांनतर एकच जल्लोष सुरु झाला. मात्र त्यातही सुनीलनं बॉल उचलून आणला आणि त्याच्या टीशर्टमध्ये आणि पोटाच्या मध्ये ठेवला जणू काही तो गरोदर आहे. पण याचं नेमकं कारण काय हे समजल्यानंतर त्याचे चाहते आणखीनच खुश झाले. खरं म्हणजे सुनील छेत्रीची पत्नी गरोदर आहे आणि त्यांना लवकरच बाळ होणार आहे. हीच बातमी चाहत्यांना देण्यासाठी त्यानं हे भन्नाट सेलिब्रेशन केलं.
ब्युरो रिपोर्ट ,एम डी टी व्ही न्यूज ,दिल्ली