सातपुड्यातील लोकप्रतिनिधींचे प्रशासनाला साकडे
नंदुरबार :- सातपुड्यातील दुर्गम व अतिदुर्गम धडगाव तालुक्यातील तसेच मोलगी परिसरातील लाखो नागरिकांना जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण नंदुरबार येथे जाण्यासाठी चांदसैली – तळोदा हा मार्ग सर्वाधिक सोईस्कर आहे. परंतु या मार्गावर शाश्वत प्रवासाची सुविधा नसल्यामुळे परिसरातील आदिवासी बांधवाना शहादा व अक्कलकुवामार्गे प्रवास करावा लागत आहे. यामुळे आर्थिक फटका बसत असून वेळी खूप जातो. यामार्गे बंद पडलेली बस सेवा पुरवत करून नवीन दोन मिनीबस तातडीने सुरु कराव्यात, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य रतन पाडवी यांच्यासह सातपुड्यातील लोकप्रतिनिधींनी केली आहे.
याबाबत नंदुरबार येथे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुका व मोलगी परिसरातील लाखो नागरिकांना प्रशासकीय व अन्य कामानिमित्त नंदुरबार या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाण जावे लागते. नंदुरबार येथे जाण्यासाठी चांदसैली – तळोदा हाच मार्ग सर्वाधिक सोईस्कर ठरतो. परंतु या मार्गावर सुखरुप प्रवासाची शाश्वत सुविधा नसल्यामुळे लाखो नागरिकांसमोर मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
परिवहन महामंडळाच्या मिनीबसची सेवा दोन महिन्यांपासून बंद असल्याने असंख्य नागरिक व विद्यार्थ्यांना अक्कलकुवा अथवा शहादामार्गे खर्चिक शिवाय वेळखाऊ प्रवास करावा लागत आहे. वेळ व पैसा खर्च करूनही नागरिकांची कामे वेळेवर होत नाही. जिल्ह्याच्या मोठ्या जनसमुदायाच्या या समस्या सोडविण्यासाठी तातडीने नंदुरबार ते धडगाव मिनीबसची सेवा (दोन फेऱ्या) पुर्ववत सुरू करावी. शिवाय मिनीबसच्याच तळोदा ते धडगाव नवीन दोन फेऱ्याही तातडीने सुरु कराव्या अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना जि.प.सदस्य तथा गटनेते रतन पाडवी, कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जि.प.सदस्य सी.के.पाडवी, जि.प.सदस्य विजय पराडके, माजी जि.प.सदस्य सिताराम राऊत, माजी सरपंच केवजी पाडवी आदी उपस्थित होते.
एम.डी.टी.व्ही. न्युज नंदुरबार