राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत शानदार आयोजन ..

0
175

राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीत प्रथम गणेश दिलीप पाटील ( गोराणे) द्वितीय विभागुन विजय नवल माळी व जगदीश शिवदास मराठे ..

धुळे :६/५/२३

येथील विरदेल रोडवरील बापु चौधरी व तुकाराम चौधरी यांच्या शेतात राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली
सदर शर्यतीचे उद्घाटन उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांच्या हस्ते करण्यात आले

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0
.हयावेळी जिल्हा उपसंघटक भाईदास पाटील, डॉ. रवींद्र देसले, माजी विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, प्रकाश चौधरी आदींची उपस्थिती होती
हया राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीत प्रथम येण्याचा मान गणेश दिलीप पाटील ( गोराणे) द्वितीय विभागुन विजय नवल माळी व जगदीश शिवदास मराठे ( शिंदखेडा) यांनी पटकाविले.
शर्यतीचे आयोजन नाना चौधरी, संतोष देसले, विक्की पाटील,शुभम भामरे, मयुर भामरे यांनी केले होते.
शिंदखेडा येथे पन्नास वर्षांत प्रथमच राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली.
ह्या पुर्वी शिंदखेडा येथील एस एस व्ही पी एस महाविद्यालयाच्या मैदानावर १९७३ साली केशव मराठे, शेखर पाटील, बी.के.देसले गृप ने आयोजित केली होती.
शर्यतीसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांचे कडून २१ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संदीप बेडसे यांनी १५ हजार रुपये तर तृतीय क्रमांक आयोजकांकडून तसेच चौथे पारितोषिक उबाठा शिवसेना जिल्हा उपसंघटक भाईदास पाटील, पाचवे पारितोषिक नंदुरबार जिल्ह्यातील डी एस वाय पी आत्माराम प्रधान यांच्या कडून प्राप्त झाले होते

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0
म्हणून आयोजकांनी विशेष आभार मानले.
सदर स्पर्धेसाठी पंच म्हणून योगेश माधवराव देसले, सुरेश आधार भामरे, प्रकाश नथ्थु पाटील, नाना परशुराम माळी, अशोक राजपाल परदेशी, गणेश खलाणे, कैलास निंबा पाटील दत्तात्रय जगन्नाथ देसले गजानन विश्वास भामरे यादव प्रेमराज मराठे, कैलास वाघ, यांनी काम पाहिले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी पिक संरक्षण सोसायटीचे चेअरमन विलास अर्जुन मोरे, व्हायचेअरमन शामकांत अरुण देसले, दिलीप आधार पाटील, भुषण देसले, बापू हरी चौधरी, तुकाराम किसन चौधरी, संजय गुलाबराव बडगुजर, मनोहर भामरे ( सचिव) रावसाहेब सुभाष देसले, श्रावण मराठे यांचे विशेष सहकार्य लाभले.
शर्यत शांततेत पार पाडण्यासाठी शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांच्या नेतृत्वाखाली पी एस आय मिलिंद पवार, गुलाब ठाकरे, पो. का.एकलाख पठाण, आबा भिल, रुपेश चौधरी, गणेश सोनवणे, विकास मराठे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता ‌.
शहरातील शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिंदखेडा येथे शर्यतीचा आनंद लुटण्यासाठी यात्रेचे स्वरूप आले होते.
गोराणेत मिरवणूक व जल्लोष शिंदखेडा तालुक्यातील गोराणे येथील गणेश दिलीप पाटील या मालकाच्या बैलगाडी ने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल गावातुन मिरवणूक व जल्लोष करण्यात आला.
त्यात सुहास कदम, पंकज कदम, पवन पाटील, कृष्णा पाटील, संजय साळुंखे, दुर्गेश पाटील, गुणवंत कदम, तान्हु फरकाटे, जगदीश साळुंखे, राहुल पाटील, ओम पाटील, भुपेंद पाटील, जितेंद्र कदम, शेखर पवार, सागर पवार, भागरकर पवार, बापू पाटील, बाळु फरकाटे यांनी सहभाग घेत जल्लोषात ग्रामस्थांनी स्वागत केले.
यादवराव सावंत ,शिंदखेडा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here