नंदुरबार -३१/३/२३
नंदुरबार जिल्ह्य़ातील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिर परिसरात खोदकाम सुरू होते त्यावेळी जमिनीच्या खाली पुरातन काळातील अखंड दगडापासून तयार केलेल्या मुर्ती दिसून येत होत्या त्यात गणपती व भगवान शंकराचे वाहन नंदी ची मुर्ती सापडली ..
शेजारी महादेव चे दोन शिवलिंगपण होते ते पण बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सूरू होते ..
शेवटी हळुहळू बाहेर काढून सर्व देवाच्या मूर्तीचे पूजा विधी करून मंदिराच्या आवारात ठेवले आहे ..
तसेच मंदिराच्या शेजारीच पुरातन काळापासून दगडापासून तयार केलेल्या भुयारी जिना पण निघाला आहे ..
त्या जिन्यातुनच पुर्वी भाविक दर्शनासाठी जात असत असे दिसत आहे ..
आता WhatsApp वरमिळवाब्रेकिंगन्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
पुर्वीच्या काळापासून हा जिना बंद होता असे समोर दिसत आहे मंदिराच्या आवारात अजून खोदकाम सुरू होते ..
निघालेल्या मूर्ती या परिपूर्ण असून कुठे खंडित दिसून आलेल्या नाहीत ..
मंदिर संस्थानचे अध्यक्ष रामचंद्र पाटील यांच्यासह सुरेश पाटील आणि ठेकेदार उपस्थित होते ..
अध्यक्ष श्री रामचंद्र दशरथ पाटील यांनी फोनवरून सांगितले की अजून काम सूरू आहे अजून बरेच काही निघू शकेल आम्ही ठेकेदाराला सांगितले आहे की लक्ष देऊन काम करा व काही निघाले तर कळवा..
रवींद्र राजपूत , प्रकाशा प्रतिनिधी ,एम. डी. टी. व्ही. न्यूज, प्रकाशा