दोन ते तीन पोलीस कर्मचारी
अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमावावर मिळवले नियंत्रण
शहरात शांतता
नंदुरबार- शहरातील महाराष्ट्र व्यायामशाळा परिसरात काल रात्री साडेअकराच्या वाजेच्या सुमारास दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली.या दंगलीत दगड, विटा यासह काचेच्या बाटल्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. त्यामुळे दोन ते तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
रात्री पोलिसांनी अश्रूधूराचा वापर करत जमावाला पांगवले. या भागात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून शांतता आहे.
पोलीसांनी संशयितांचा शोध घेत धरपकड सुरू केली असून 15 ते 20 जणांना ताब्यात घेण्यात आले.
पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी परिस्थिवर लक्ष ठेऊन आहेत.
नंदुरबार शहरातील महाराष्ट्र व्यायामशाळा परिसरात जुन्या वादातून दोन गटात दगडफेक झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान
या घटनेत दोन अधिकाऱ्यांसह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरात जुन्या वादातून दोन गटात तूफान दगडफेक झाली असून मोटर सायकलची नुकसान करण्यात आले आहे. यावेळी जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून धरपकड सुरू होती. जवळपास 15 ते 20 संशयतांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सध्या परिसरात पूर्ण शांतता आहे. शहरातील संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी परिसरात जाऊन पाहणी केली. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, शहर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी तळ ठोकून आहेत.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो …नंदुरबार