शिंदखेडा : १४/३/२३
येथील काकाजी मंगल कार्यालयात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद महिला बालविकास प्रकल्प व एकात्मिक महिला बालकल्याण विभाग पंचायत समितीच्यावतीने सर्व समावेशक तालुका महिला मेळावा घेण्यात आला.
सदर मेळाव्याचे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले.
तर मेळाव्याचे अध्यक्षस्थानी धुळे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस यांनी सावित्रीबाई फुले भारतमाता प्रतिमेचे पूजन केले. नितीन सासके गृपच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमांचे मान्यवरांचे स्वागत केले.
प्रास्ताविक गटविकास अधिकारी देविदास देवरे यांनी केले
स्वागतगित देवी अंगणवाडी खटाबाई गिरासे व बच्छाव सेविकांनी म्हटले.
प्रसंगी धुळे जिल्हा परिषद महिला बालविकास व बालकल्याण सभापती संजिवनी सिसोदे, जिल्हा परिषद सदस्या कुसुमताई निकम, सत्यभामा मंगळे सोनी युवराज कदम, ज्योतीताई बोरसे, पंचायत समिती सभापती वंदना भारत ईशी, शिक्षण व आरोग्य सभापती महाविरसिंह रावल, गटविकास अधिकारी देविदास देवरे, गटशिक्षणाधिकारी डॉ सी के पाटील, आरोग्य अधिकारी डॉ निलेश पाटील, बचत गट अधिकारी राजेंद्र पाटील, महिला बालकल्याण अधिकारी सचिन शिंदे, वैद्यकीय अधिकारी रुचिरा पवार, एकात्मिक बालविकास अधिकारी एस.बी.मराठे , भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, उपाध्यक्ष रावसाहेब अनिल वानखेडे, भाजपचे गटनेते कामराज निकम , पंकज कदम, डी आर पाटील, भारत ईशी, जिजाबराव सोनवणे, तालुका ध्यक्ष प्रा. आर जी खैरनार , शहराध्यक्ष प्रवीण माळी, आदी उपस्थित होते.
नवीन लहान जन्माला आलेल्या मुलांचे स्वागत, गर्भवती महिलांचा ओटीभरण , सकस आहार किट वाटप, विविध महिलांनी आहार पाक कला प्रदर्शन , रांगोळी स्पर्धा, मुलींना धनादेश वाटप , उत्कृष्ट कामगिरी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सन्मानित करण्यात आले.
शिंदखेडा मतदारसंघात भरीव दोन हजार कोटी रुपयांची तरतूद मंजूर करून आणल्याबद्दल सभापती संजिवनी सिसोदे ,संजय सिसोदे, सिद्धार्थ सिसोदे, युगंधरा सिसोदे सह नगरपंचायत माजी गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे सह माजी उपनगराध्यक्ष, माजी नगरसेवकांनी जाहीर सत्कार केला.,
हयावेळी मुलीचा जन्म नको, स्त्रीभ्रूणहत्या हत्या, समाजप्रबोधन जनजागृती नाटिका, गिते व सांस्कृतिक कार्यक्रम सादर, नृत्य सादर करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी एस. बी.मराठे, कनिष्ठ सहाय्यक एस. बी. सोनवणे, परिचर पी.आर.बोरसे सह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले .
शिंदखेडा पंचायत महिला बालविकास, शिक्षण, आरोग्य, कृषी वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले होते.
सुत्रसंचलन पर्यवेक्षीका वैशाली निकम यांनी केले.
तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
यादवराव सावंत शिंदखेडा तालुका प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज