नंदुरबार :११/३/२०२३
बेकायदेशीर धंदे दारू जुगार यासारख्या अवैध धंद्यांचे प्रमाण सध्या शहादा शहरात वाढले ..
ते नियंत्रणात आणण्यासाठी संविधान आर्मीने थेट शहादा पोलीस स्टेशन गाठलं..
बेकायदेशीर धंदे या स्वरूपाचे बंद झाले पाहिजे यासाठीच निवेदन शहादा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक राजन मोरे यांना देण्यात आलं..
आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शहादा शहरात शहादा पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर केलं..
पोलीस निरीक्षकांनी संविधान आर्मीला आश्वासन दिले की जे लोक बेकायदेशीर व्यवसाय चालवत आहे त्यांच्यावर लवकरात लवकर कडक कार्यवाही करण्यात येईल..
कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संविधान आर्मीने दिलाय..
यावेळी नंदुरबार जिल्हा अध्यक्ष अल्तमश मंसूरी आकाश जावरे अवेश पटवे, नवीद अन्सारी शाब्बार शेख, हाशिम कुरेशी, मोईन कुरेशी जुबेर शाह आदी पदाधिकारी उपस्थित होते
एम.डी.टी.व्ही न्यूज ब्युरो नंदुरबार