नंदुरबार पोलिसांची दमदार कामगिरी ..

0
175

नंदुरबार : ६/३/२०२३

दिनांक 04 मार्च रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त खबरी मार्फत बातमी मिळाली की, नवापूर पोलीस ठाणे हद्दीतील लक्कडकोट येथील रुस्तम गावीत हा चारचाकी वाहनांमधून महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात अवैध दारुची चोरटी वाहतूक करणार आहे.

Nandurbar News | राम रघुवंशींनी घेतली सरपंच उपसरपंचांची शाळा…! | Ram Raghuvanshi

तसेच त्याचेवर यापुर्वी देखील नवापूर पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायद्यान्वये 2 व दारुबंदी कायद्यान्वये 1 असे एकुण 3 गुन्हे दाखल असून गुन्हा घडले पासून रुस्तम गावीत हा फरार होता, अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सदर माहिती नवापूर पोलीस ठाणा पोलीस निरीक्षक. ज्ञानेश्वर वारे व स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना सांगितली.

त्यांनी नवापूर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे मिळून एक पथक तयार करुन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करुन कारवाई करणेबाबत आदेशीत केले.

नवापूर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नवापूर पोलीस ठाणे हद्दीतील लक्कडकोट येथे आरोपीच्या घराच्या आजु-बाजुला स्थानिक नागरिकांच्या वेशभूषेत वेशांतर करुन सापळा रचला.

तसेच रुस्तम जमनादास गावीत याचे घरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर पाळत ठेवली.

त्याच दरम्यान पथकाने रुस्तम जमनादास गावीत याचे घरावर छापा टाकला असता एक इसम पोलीसांना पाहून पळू लागला, नवापूर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास ताब्यात घेतले.

ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता, रुस्तम जमनादास गावीत (35 ) रा. पिपलकुवा ता.सोनगढ जि. तापी गुजरात ह.मु. लक्कडकोट ता. नवापूर जि. नंदुरबार असे सांगितले. तसेच त्याच्या घराच्या कंपाऊंडमध्ये उभे 3 चारचाकी वाहन उभे दिसले. म्हणून पथकांनी वाहनांची पाहणी केली असता त्यामध्ये खालील प्रमाणे मुद्देमाल मिळून आला-

2 लाख 25 हजार 120 रुपये किमतीचे देशी दारु सुगंधी संत्राचे एकुण 67 खोके, एका खोक्यामध्ये 180 एम.एल.चे 48 बाटल्या, अशा एकुण 3216 नग काचेच्या बाटल्या,
1 लाख 14 हजार 800 रुपये किमतीची DSP Black Delux Whisky च्या 180, 350 व 750 एम.एल.च्या एकुण 469 बाटल्या.
53 हजार 760 किमतीचे Imperial Blue Hand Picked Grain Whisky चे एकुण 14 खोके, एका खोक्यामध्ये 180 एम.एल.चे 48 बाटल्या, अशा एकुण 672 नग काचेच्या बाटल्या.
67 हजार 200 रुपये किमतीची Tuborg Premiun Beer चे एकुण 20 खोके, एका खोक्यामध्ये 500 एम.एल.चे 24 नग पत्रटी टिन असे एकुण 480 नग पत्रटी टिन.
59 हजार 280 रुपये किमतीची Haywards 5000 Premium Strong Beer चे एकुण 19 खोके, एका खोक्यामध्ये 500 एम.एल.चे 24 नग पत्रटी टिन असे एकुण 456 नग पत्रटी टिन.
21 हजार 600 किमतीचे Royal Stag Barrel Select Whisky चे एकुण 02 खोके, एका खोक्यामध्ये 375 एम.एल.चे 24 बाटल्या, अशा एकुण 48 नग काचेच्या बाटल्या.
13 हजार 920 रुपये किमतीची Kingfisher Strong Premium व London Pilsner Premium Beer चे एकुण 7 खोके एका खोक्यामध्ये 500 एम.एल.चे 24 नग पत्रटी टिन असे एकुण 120 नग पत्रटी टिन,

असा एकुण 29 लाख 95 हजार 680 रुपये किमंतीचा मुद्देमाल मिळून आल्याने कायदेशीर प्रक्रिया करुन सदरचा मुद्देमाल जप्त करुन रुस्तम जमनादास गावीत (35) रा. पिपलकुवा ता.सोनगढ जि. तापी गुजरात ह.मु. लक्कडकोट ता. नवापूर जि. नंदुरबार याचेविरुध्द् नवापूर पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

आरोपी रुस्तम जमनादास गावीत याचे मागे असलेल्या तसेच सदर गुन्ह्यात सहभाग असणाऱ्यांची गय केली जाणार नाही,

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, सहा. पोलीस उप निरीक्षक गुमानसिंग पाडवी, दादाभाई वाघ, दिनेश वसुले, योगेश थोरात, प्रेमचंद जाधव, दिनेश बावीस्कर, गणेश बच्छे, श्याम पेंढारे, रणजित महाले, किशोर वळवी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, जितेंद्र तोरवणे व जितेंद्र ठाकुर यांच्या पथकाने केली आहे.

प्रविण चव्हाण ,जिल्हा प्रतिनिधी,एम. डी. टी.व्ही नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here