जळगाव – ३०/३/२३
वारंवार निवेदन देऊन सुद्धा विद्यापीठ दखल घेत नसल्यामुळे विधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठावर 27 मार्च 2023 रोजी ठिय्या आंदोलन केले शांतते रित्याने आंदोलन करत असताना अचानक विद्यापीठाच्या मुख्य बिल्डिंगच्या प्रवेश द्वार वर असेले मधमाश्याच्या पोळा उडवण्यात आला
आणि मधमाश्या ह्या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यानवर हल्ला केला त्यामुळे आंदोलन करणारे विद्यार्थीची पळापळ झाली होती
मात्र पुन्हा काही वेळात सर्व विद्यार्थी एकत्र आले
आणि आंदोलन सुरु ठेवले
या हल्ल्यात 2 विद्यार्थी बेशुद्ध ही पडले होते
तसेच बहुसंख्यक विद्यार्थी जखमी झाले आणि अनेक जण मधमाश्या पासून वाचण्यासाठी झाडावर चढले..
सदर आंदोलन दडपण्यासाठी प्रशासनानेच हे पोळ उडवल्याचा आरोप विद्यार्थ्यानी यावेळी केला .. सदर या आंदोलनदरम्यान विद्यार्थ्यानी विद्यापीठाच्या मुख्य गेटला टाळे लावून आपला संताप व्यक्त केला.
हिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या एलएलबी द्वितीय, तृतीय वर्ष, बीए एल.एल.बी. द्वितीय वर्ष, व एल.एल.एम सेमिस्टर पाचव्या वर्षाची परीक्षा डिसेंबर व जनवरी 2022 – 23 या महिन्यात घेण्यात आली होती सदर परीक्षेत विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील सुमारे 80 ते 90 टक्के विद्यार्थी या परीक्षेत नापास झाले होते
तरी सदर परीक्षेच्या निकालात त्रुटी असून सदर परीक्षेच्या पेपरचे पुन्हा तपासणी करण्यात यावी अशी मागणी विद्यापीठ सलग्नित सुमारे 6 महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनेक वेळा निवेदनामार्फत केली होती
परंतु सदर मागणीवर विद्यापीठातर्फे कोणतीही विचार न करण्यात आल्याने दिनांक 27 मार्च रोजी सकाळी सकाळी 11 वाजता विद्यापीठवर ठिया आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालय प्रतिनिधी म्हणून विद्यार्थी आंदोलनात कोर कमिटीचे सदस्य सम्राट सोनवणे, किशोर खलसे (गोदावरी विधि महाविद्यालय- जळगाव), निशा अग्रवाल (एस. एस. बियाणी विधि महाविद्यालय – धुळे), शुभांगी फासे (मनियार विधि महाविद्यालय – जळगाव), शुभम जैन (भंसाली) (जामिया विधि महाविद्यालय – अक्कलकुवा)
मिलिंद बैसाणे, विक्रम साळुंखे पाटील (एस एस बियाणी लॉ कॉलेज धुळे) आदी सह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते
यावेळी कोर कमिटीच्ये सदस्यांना कुलगुरु श्री. व्ही.एल.माहेश्वरी यांच्या दालनात बोलवण्यात आले
यावेळी त्यांना कोर कमिटीच्या सदस्यांनी निवेदन दिले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
त्यात विधि शाखेच्या विद्यार्थ्यांच्या लागलेल्या तत्रुटि व संशयित असलेल्या निकालाबाबत सर्व समस्या सांगण्यात आले, तसेच 48 तासात कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही तर बेमुदत महाविद्यालय बंदच्या इशारा यावेळी देण्यात आले.
यावेळी कुलगुरु माहेश्वरी यांनी सांगितले की, आपली समस्या लवकरात लवकर सोडवण्यात येणार असल्याच्ये सांगितले आणि 29 मार्च रोजी विद्यापीठ संलग्न असलेल्या सर्व विधि विद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापकांची बैठक बोलवण्यात आली
ह्या बैठकी मागच्या उद्देश् सध्या स्पष्ट नाही, मात्र विद्यार्थी हे आपल्या मागण्यावर ठाम आहे जो पर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्याच्ये यावेळी सांगण्यात आले.
यावेळी एस एस मनियार विधी महाविद्यालय- जळगाव
डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालय- जळगाव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल विधी महाविद्यालय- धुळे
एस. एम. बियाणी विधी महाविद्यालय धुळे
एन. टी. व्ही. एस. विधी महाविद्यालय – नंदुरबार
जामिया विधी महाविद्यालय – अक्कलकुवाया महाविद्यालयांचे बहुसंख्य विद्यार्थी आंदोलन वेळी हजर होते.
यावेळी कायद्या सुव्यवस्थासाठी पोलिस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी ही उपस्थित होते.
शुभम भंसाली,अक्कलकुवा तालुका प्रतिनिधि,एम डी टी व्ही न्यूज