विद्यार्थी घेणार आनंददायी शिक्षण : शिक्षण विभागाचा धाडसी निर्णय..

0
200

कोल्हापूर -२४/५/२३

पहिलीपासून ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्याने पालक चिंतेत होते.

या ओझ्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पाठ आणि मानेच्या व्याधी वाढल्या होत्या. यावर पालक, शिक्षक संघटनांनी आवाज उठवल्यावर पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शिक्षण विभागाने तयार केलेल्या ‘एकात्मिक पाठ्यापुस्तक योजने’ची अंमलबजावणी जून 2023 पासून होणार आहे. त्यामुळे राज्यातील लाखो तर कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व महापालिकेच्या 2 लाख 7 हजार 209 विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी होईल.

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत ‘एकात्मिक पाठ्यापुस्तक योजने’ची अंमलबजावणी 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार पुस्तकांची छपाईही झाली असून शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यापुस्तकांचे वाटप केले जाणार आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

सर्व विषयांची पुस्तके शाळेत घेवून जाण्याऐवजी अभ्यासक्रमाची तीन भागात विभागणी केली आहे. परिणामी तीन महिने एकच पुस्तक शाळेत घेवून जावे लागेल. या पुस्तकातच स्वाध्याय सोडवण्यासाठी प्रत्येक पाठ्याक्रम (धड्या)च्या पाठीमागे काही पाने स्वाध्याय सोडवण्यासाठी कोरी ठेवली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना बालभारती (मराठी), सुलभभारती (हिंदी), इंग्रजी, गणित आणि विज्ञान (द्विभाषिक), इतिहास व नागरिकशास्त्र आणि भूगोल या सात विषयांची वेगवेगळी पुस्तके शाळेत नेण्याची गरज नाही. त्यामुळे दप्तराचे ओझे घेवून वाडी, वस्ती, डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होईल. या विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण मिळेल.

एवढेच नव्हे तर दप्तराच्या ओझ्याने होणाऱ्या पाठीच्या व्याधीपासून मुक्तता मिळेत.

वाडीवस्ती व डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना दिलासा
कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह महापालिकेच्या जवळपास 2 हजार 177 शाळांमधील 2 लाख 7 हजार 209 विद्यार्थ्यांना ‘एकात्मिक पाठ्यापुस्तक योजना’चा लाभ होणार आहे. जिल्ह्यातील राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा, गगणबावडा, हातकणंगले, शिरोळ यासह अन्य तालुक्यातील वाडी, वस्ती आणि डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना घरापासून दूर शाळेला चालत जावे लागते. हे विद्यार्थी दप्तराचे ओझे घेवूनच थकतात, अशा विद्यार्थ्यांना ओझ्यापासून सुटका मिळणार आहे

कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या शाळा व विद्यार्थी
जिल्हा परिषद
शाळा विद्यार्थी
1973 1 लाख 68 हजार
महापालिका
शाळा विद्यार्थी
204 69 हजार 209
तीनपट ओझे कमी
वह्या-पुस्तके मिळून पूर्वी पाच ते दहा किलोपर्यंत दप्तराचे ओझे असायचे. आता तीन भागात विभागणी केल्याने पहिली ते चौथीपर्यंत अडिच किलो. पाचवी ते अठवीपर्यंत पुस्तकाचे वजन पाच किलो झाले आहे. त्यापुळे पूर्वीपेक्षा तीनपटीने वजन कमी झाल्याने विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या पाठीच्या मणक्यचे आजार कमी होणार आहेत.

विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण मिळेल
एकात्मिक पाठयपुस्तक योजनेसंदर्भात राज्य शिक्षण विभागाकडून सूचना मिळाल्या आहेत. समग्र शिक्षा अभियान अंतर्गत देण्यात येणाऱ्या एकात्मिक पाठ्यापुस्तक योजनेमुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी होईल. सर्व विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण मिळेल आणि पाठीच्या व्याधीपासून सूटका मिळेल.

सारिका गायकवाड ,प्रतिनिधी ,कोल्हापूर एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here