नंदुरबार : – शिंपी समाजाच्या सर्व पोटजातीनी एकत्र येण्याची काळाची गरज आहे. जुने विचार बाजूला सारुन नव्या विचारांची गरज असल्याचे प्रतिपादन अन्न आयोग समितीचे ( महाराष्ट्र राज्यमंत्री दर्जा ) अध्यक्ष महेश ढवळे यांनी केले. ते शिंपी समाजाच्या पदाधिकार्यांच्या बैठकीत बोलत होते.
नंदुरबार येथे महाराष्ट्राचे अन्न आयोग समितीचे ( राज्यमंत्री दर्जा ) अध्यक्ष महेश ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंपी समाजातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी श्री. ढवळे म्हणाले की, शिंपी, रंगारी, भावसार अशा अनेक पोटजाती आहेत. त्यात गुजराती, दर्जी, सोलंकी, शिपा, नामदेव शिंपी हे सर्व शिंपी असून पण मात्र विखुरले गेले आहेत. या सर्वांनी एकत्र येण्याची आज समाजाला गरज आहे. यासाठी रोटी-बेटी व्यवहार झाला पाहीजे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
सोलापूर भागात मराठवाड्यात नामदेव शिंपी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. शिंपी समाजाची महाराष्ट्रात जनगणना झाली पाहीजे. आपली वज्रमूठ कशी निर्माण होईल व ती भक्कम असावी, यासाठी समाजाने प्रयत्नशील असले पाहीजे. आपसातील मतभेद व परस्परांची प्रगती अनेकांना खुपते. त्याऐवजी तुम्ही समाजाच्या व्यक्तीला बळ द्या. तसेच महिलांच्या बाबतीत बचत गट स्थापन करुन त्यांना रोजगार उभा करण्याची जबाबदारी समाजाने घेतली पाहीजे. त्यासाठी शासन दरबारी जी मदत लागेल ती करुच, असे आश्वासन दिले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
गजेंद्र शिंपी म्हणाले की, समाज जरी लहान असला तरी आपण संघर्षातून सामाजिक कामाच्या चेहरा समाजासमोर ठेवला पाहिजे. कामाची पावती म्हणून दोन वेळा नगरसेवक झालो. समाजाने व समाजातील कुटुंबांनी एकत्र राहिले पाहिजे आताची परिस्थिती बिकट आहे. मुलं आई-वडिलांपासून वेगळी चूल मांडता आहे. वेगळे न राहता आई-वडिलांसोबत आपण राहिले पाहिजे कारण त्यांनी आपल्याला लहानाचे मोठे केले आहे. याची जाणीव असली पाहिजे, असे सांगितले.
या बैठकीस हिरालाल शिंपी, प्रशांत बिरारी, हरिष जाधव, शैलेष शिंपी, वैभव करवंदकर, मुकेश सोनवणे, राहुल पवार आदी उपस्थित हेाते.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.