शेतकऱ्यांचं प्रांत अधिकाऱ्यांना साकडे,पंचनामे करा..

0
143

शिंदखेडा : १०/३/२०२३

तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने झोडपले असुन वादळीवाऱ्यासह गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले.

असून त्वरित पंचनामे करण्यात यासाठी आज शिरपूर उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे व तहसीलदार आशा गांगुर्डे यांना निवेदन देण्यात आले.

शिंदखेडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व युवक राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष निखिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ मिळावी

यासाठी महसूल व कृषी विभागाच्या वतीने तात्काळ पंचनामा करावा आणि शासनाकडे पाठपुरावा करून त्वरित अहवाल सादर करावा शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

दिरंगाई झाल्यास शिंदखेडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तिव्र आंदोलनाचा इशारा यानिमित्ताने देण्यात आला आला. ह्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष निखिल पाटील, युवक तालुकाध्यक्ष मिलिंद देसले,

ओ.बी.सी. सेल जिल्हाध्यक्ष ईश्वर माळी, ग्रंथालय सेल जिल्हाध्यक्ष दीपक जगताप, ग्रंथालय सेल तालुकाध्यक्ष हर्षदिप वेंदे, ओ.बी.सी.शहराध्यक्ष हर्षल महाजन, अँड. निलेश देसले, तालुका संघटक गणेश खलाणे,

जिल्हा संघटक योगेश पाटील, युवक शहर उपाध्यक्ष राजेंद्र ऊर्फ गोलु देसले, शहर उपाध्यक्ष चेतन देसले, देवीदास मोरे, कपील पाटील, भुषण पाटील, विशाल निकम, राहुल सोनवणे, भुषण पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यादवराव सावंत शिंदखेडा प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here