नंदुरबार : – दररोज बदलणाऱ्या वातावरणामुळे तापमानात वाढ होत आहे. मात्र आज प्रथमच सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. सकाळी १० वाजेपासून उन्हाचे चटके सोसणाऱ्या नंदुरबारकारांना आज वाळवंटात असल्याची अनुभती झाली. आज तापमानाचा पाराने ४३ अंश ओलांडल्याने अनेकांना विविध समस्यांचा सामना करावा लागला.
नंदुरबार जिल्ह्यातील कमाल तापमान येत्या काही दिवसात ४२ ते ४५ अंशापर्यंत जाण्याची शक्यता कोळदा कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी हवामान केंद्रातर्फे देण्यात आली होती .दरम्यान, आज ४३.४ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
नंदूरबार जिल्हयात आज ४३.४ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. कृषी विज्ञान केंद्राचे कृषी हवामान शास्त्रज्ञ सचिन फड यांनी सांगितले की, भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त माहितीनुसार सध्या राज्याच्या उत्तर आणि पश्चिमेकडील भागातून उष्ण आणि कोरडे वारे वाहत आहेत. तापमानात अचानक वाढ झाल्याचे दिसून येत असून पुढील काही दिवस तापमान जास्त राहील.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
आज तापमानात अचानक वाढ झाल्याने उन्हाच्या झळा जाणवत होत्या. तापमानात वाढ होत असल्याने शेतकरी बंधूंनी उन्हाळी भुईमूग,बाजरी, मूग, तीळ इत्यादी पिकास, फळबागांना केळी, पपई, भाजीपाला पिकांना गरजेनुसार पाणी देण्याची व्यवस्था करावी. पाणी देण्यासाठी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळची वेळ निवडावी.
दरम्यान, लोकांनी पुढील काही दिवस विशेषतः दुपारी १२ ते ४ या काळात थेट उन्हात जाणे टाळावे, शरीराचे तापमान थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवून मुबलक प्रमाणात कालांतराने पाणी प्यावे.
जनावरांच्या शरीराचे तापमान संतुलित राहण्यासाठी दुपारच्या वेळी जनावरांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे किंवा पोते पाण्याने भिजवून शरीरावर बांधावे त्यामुळे शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होईल, अशी माहिती जिल्हा कृषी हवामान केंद्र, डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार यांनी दिली आहे .
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार.