Nandurbar News Today : सनराईज इंग्लिश मिडीयम स्कूल सारंगखेडा येथे बक्षीस समारंभ मोठ्या उत्साहात साजरा…!

0
111
Nandurbar News Today Sunrise English Medium School Sarangkheda

Nandurbar News Today  –  सनराईज इंग्लिश मिडीयम स्कूल सारंगखेडा येथे बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आजच्या दिनी सारंगखेडा गावाचे विद्यमान सरपंच श्री. पृथ्वीराजसिंह रावल यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत शाळेतील विद्यार्थ्यांना विविध खेळांचे साहित्य भेट म्हणून दिले.

विविध खेळातील साहित्य मिळाल्याने उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष करत विलक्षण आनंद व्यक्त केला.कार्यक्रमाची सुरुवात ही संस्था अध्यक्षा सौ. ऐश्वर्या जयंपालसिंह रावल (विद्यमान नंदूरबार जि. प. सदस्या), श्री पृथ्वीराजसिंह दिलीपसिंह रावल(सरपंच सारंगखेडा ग्रामपंचायत), Adv.सौ दीपिका पृथ्वीराजसिंह रावल, श्री भगवान भिल (उपसरपंच सारंगखेडा), श्री. प्रभाकर कुवर ( ग्रामपंचायत सदस्य सारंगखेडा) श्री. नानभो भील(ग्रामपंचायत सदस्य सारंगखेडा) श्री सुरातसिंग गिरासे (पालक प्रतिनिधी) श्री रविंद्र पाटील (पालक प्रतिनिधी) यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली. ( Nandurbar News Today )

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

तद्नंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. एशवर्या जयंपालसिंग रावल यांनी शालेय जीवनात विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यातील येणाऱ्या स्पर्धेच्या युगात आपले भक्कम स्थान प्राप्त  करता येते असे आपल्या मनोगतातून उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना सांगितले. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पृथ्वीराजसिंह रावल यांनी शालेय जीवनात विविध स्पर्धानच्या माध्यमातून विद्यार्थ्यांत शिक्षणाची गोडी वाढून अभ्यासाची ओढ लागते तसेच शाळेत नियमितपणे आनंदी व उत्साही वातावरण सदैव टिकून रहाण्यास मदत होते असे आपल्या मनोगतातून सांगितले.

या नंतर शालेय स्पर्धामधील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पालकांसमवेत मानचिन्ह (ट्रॉफी) देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या सरतेशेवटी शाळेचे पालक श्री. रवींद्र पाटील यांनी शाळेची नवोदित उपक्रमातील नावीन्यता आपल्या मनोगतातून सांगताना आपली शाळा ही उत्कृष्ट उपक्रम शील शाळा असल्याचे सांगितले व भविष्यात देखील अशेच वाखाणण्याजोगे कार्यक्रम शालेय व्यवस्थापना कडून घडावेत यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व उपस्थित पालकांनी आवाजी मताने शाळेतील विविध कार्यक्रम आयोजना साठी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन योगिता पाटील व अजय पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन ऋतुजा देसले यांनी केले.

अशा प्रकारे सनराईज इंग्लिश मिडीयम स्कूल येथे बक्षिस वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात संस्था अध्यक्षा सौ ऐश्वर्या जयंपालसिंग रावल यांच्या मार्गदर्शनाने व शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रवीण पोतदार यांच्या नियोजनाने व्यवस्थित पार पडला. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच समर्थ कोचिंग क्लाससेस चे प्रमुख श्री अजय पाटील सरांचे विशेष सहकार्य लाभले.

गणेश कुवर – प्रतिनिधी सारंगखेडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here