मुंबई/दिल्ली -११/५/२३..
राज्यातील सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे.
सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार यावर संपूर्ण महाराष्ट्राचं राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे.. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल अवघ्या काही तासांवर आलेला आहे.. आज सकाळी 11 वाजता हा निकाल येणार आहे..
सरकार कोसळेल अशी चर्चा रंगू लागली आहे.. मात्र ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया की या सरकारच्या सध्याचे पक्षीय बलाबल कसे आहे..
भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट शिवसेना यांची नैसर्गिक युती झाल्याचं शिंदे सह त्यांचे आमदार देखील कायम बोलत असतात..
सध्या भारतीय जनता पक्षाकडे 112 आमदारांची संख्या आहे.. तर शिवसेना शिंदे गटाकडे एकूण 50 आमदार आहेत.. असे एकूण पक्षीय बलाबल भाजप शिवसेना युतीकडे 162 आहेत.. तर बहुमताचा आकडा सरकार स्थापन करण्यासाठी 145 लागतो.. त्यामुळे भाजप आणि शिवसेना युतीच्या सरकारला कुठलाही धोका नाही.. तर विरोधी पक्षांच्या पक्षीय बलाबल वर एक नजर टाकली असता.. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे 54 तर काँग्रेस पक्षाकडे 45 आमदारांची संख्या आहे.. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे 16 आमदारांची संख्या आहे.. आणि अन्य या घटकात 11 आमदार आहेत.. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापठाने जरी 16 आमदार अपात्र ठरवले तरी सध्याचे सरकार स्थिर म्हणवले असं म्हणायला हरकत नाही.. तरीदेखील सुप्रीम कोर्टाच्या या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून असणार आहे.. हा ऐतिहासिक निकाल कोणाच्या बाजूने एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे हे पाहणं महत्त्वाचे ठरेल..
कार्यकारी संपादक जीवन पाटील यांच्यासह नाशिकहून तेजस पुराणिक सह एम डी टी व्ही न्यूज ब्युरो मुंबई /नवी दिल्ली