दिगंबर जैन सोशल ग्रुप फेडरेशन: रा.विभागीय अध्यक्षपदी सुरेश जैन…

0
98

नंदुरबार -२/४/२०२३

आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या दिगंबर जैन सोशल ग्रुप फेडरेशनच्या महाराष्ट्र राज्य विभागीय अध्यक्षपदी येथील सुरेश जैन (अजमेरा) यांची नुकतीच निवड झाली.

तसेच पुणे येथील प्रसून जैन यांची सेक्रेटरी आणि चोपडा येथील राजेंद्र जैन यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
रविवारी इंदुर येथील रवींद्र नाट्य मंदिर गृहाच्या भव्य सभागृहात शानदार शपथविधी समारंभ पार पडला.

दि. 30 जुलै 1944 रोजी स्थापन झालेल्या दिगंबर जैन सोशल ग्रुप फेडरेशन संस्थेच्या देश -विदेशात 350 हुन अधिक शाखा असुन 35 हजार दांपत्य या संघटनेचे सक्रिय सदस्य आहेत.नंदुरबार येथील दिगंबर जैन समाजाचे सुरेश तुमडूलाल जैन (अजमेरा) यांचे सामाजिक कार्यातील
महत्वपूर्ण योगदानामुळे महाराष्ट्र राज्य विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक कराआणि जॉईनकरा. https://bit.ly/36S6BFu
शपथ ग्रहण सोहळ्यास राष्ट्रीय अध्यक्ष राकेश जैन, महासचिव विपुल बाझल, शिरोमणी संरक्षक पुष्पा कासलीवाल उपस्थित होते.सुरेश जैन यांच्या निवडी बद्दल खानदेश दिगंबर जैन समाजासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.

प्रविण चव्हाण एम. डी. टी.व्ही न्यूज ,जिल्हा प्रतिनिधी,नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here