Nandurbar News Today : आयोध्या जाणारी रेल्वेवर दगडफेक केल्याची अफवेला उधान,प्रशासन ऍक्शन मोडवरती..!

0
290
Suspicion of stone pelting on Astha Express Nandurbar News Today

सुरतहून अयोध्येकडे जाणाऱ्या आस्था एक्स्प्रेसवर रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास नंदुरबार रेल्वे स्थानकाजवळ दगडफेक झाल्याची तक्रार काही प्रवाश्यांनी केली.

मुख्य मुद्दे:

  • सुरतहून अयोध्येकडे जाणाऱ्या आस्था एक्स्प्रेसवर दगडफेकीचा संशय.
  • नंदुरबार रेल्वे स्थानकाजवळ रविवारी रात्री ११ च्या सुमारास घटना.
  • काही प्रवाशांनी दगडफेकीची तक्रार नोंदवली.
  • रेल्वे पोलीस दलाकडून तपासणी, पुरावे न आढळणे.
  • अज्ञातांविरोधात तक्रार दाखल.
  • मनोरुग्ण आणि मद्यपी व्यक्ती ताब्यात, दगडफेकीचा संबंध नाही.
  • उपविभागीय पोलीस अधिकारी आणि शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी. ( Nandurbar News Today )

Nandurbar News Today – आयोध्या येथील राम लल्लाचे दर्शन घेण्यासाठी लाखोंचे भक्त जात असून ११ फेब्रुवारी च्या रात्री सुरत हुन आयोध्याला जाणारी आस्था रेल्वे नंदुरबार रेल्वेस्टेशन ( Nandurbar Railway ) नजदिक रेल्वेवर अज्ञात समाज कंठकांनी दगडफेक केल्याची घटना घडली असलीचे सोशल मीडिया वरती आफवाना उधान आले असून रेल्वे प्रशासन व नंदुरबार पोलीस प्रशासन चांगलेच ऍक्शन मोड वरती आलेकाही प्रवाशांनी नंदुरबार रेल्वे स्थानकाजवळ रात्री ११ च्या सुमारास दगडफेक झाल्याची तक्रार नोंदवली. रेल्वे पोलीस दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासणी सुरू केली. मात्र, दगडफेकीचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत.

Rumors of stone pelting on the train going to Ayodhya have been raised Nandurbar News Today

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

तथापि, पोलिसांनी अज्ञातांविरोधात तक्रार नोंदवून घेतली आहे. तपासादरम्यान, झाडाझुडपात झोपलेले दोन व्यक्ती आढळून आले. त्यापैकी एक नांदेडचा रहिवासी असून तो मद्यपी होता, तर दुसरा मनोरुग्ण असल्याचे समोर आले. मनोरुग्णाने एका पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आणि जिल्हा शासकीय रुग्णालयातील मनोरुग्ण विभागात दाखल करण्यात आले.

Suspected of stone pelting on Astha Express from Surat to Ayodhya Express
Suspected of stone pelting on Astha Express from Surat to Ayodhya Nandurbar News Today

दरम्यान, या प्रकरणात कोणताही प्रत्यक्षदर्शी पुढे न आल्याने आणि पुराव्यांचा अभाव असल्याने दगडफेक झालीच नसल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे. तरीही, घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन आणि शहर पोलीस ठाण्याचे राहुल पवार यांनी भेट देऊन संपूर्ण घटनेचा आढावा घेतला आहे. तरी सदरील घटना विषयक सोशल मीडियावर पोस्ट पसरू व कुठल्याही अफवाना बळी पडून जिल्ह्यात शांतता कायम राहावी यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावी असे अहवान पोलीस प्रशासनमार्फत करण्यात आले आहे.

संजय मोहिते नंदुरबार

Rumors of stone pelting on the train going to Ayodhya have been raised

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here