नंदुरबारात तलवार हल्ला : जमीनसिंग व आसमानसिंग जखमी

0
1662

नंदुरबार :- अनैतिक संबंधाच्या कारणातून तलवारीने वार करीत दोन भावांना जखमी केल्याची घटना नंदुरबार शहरात घडली. यात एकाचे बोट छाटण्यात आले तर दुसर्‍याच्या तोंडावर वार करुन दुखापत करण्यात आली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील एकता नगर भागातील रहिवासी जमिनसिंग दिलीपसिंग शिकलीकर व त्यांचा भाऊ आसमानसिंग यांना मारहाण करुन जखमी करण्यात आले. जोगरसिंग दयालसिंग शिकलीकर याने तलवारीने वार करीत जमिनसिंग शिकलीकर यांच्या उजव्या हाताच्या पंजाचे बोट छाटले. तसेच त्यांना उर्वरीत दोन संशयीतांनी हाताबुक्क्यानी मारहाण केली.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

रात्री घरासमोर झोपलेल्या जमिनसिंग शिकलीकर यांचा भाऊ आसमानिसिंग यांच्या तोंडावर प्रधानसिंग शिकलीकर याने तलवारीने वार करुन जबड्यावर दुखापत केली. याबाबत जमिनसिंग दिलीपसिंग शिकलीकर यांनी नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रधानसिंग बरवत्कावरसिंग शिकलीकर, मिनीकौर प्रधानसिंग शिकलीकर, जोगरसिंग दयालसिंग शिकलीकर या तिघांविरुद्ध भादंवि कलम ३२६, ३२३, ५०४, ५०६, ३४, व भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेकॉ. दिलीप सुर्यवंशी करीत आहेत.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here