‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर व लेखकावर बंदी आणून कठोर कायदेशीर कारवाई करा : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची मागणी

0
300

मुंबई /नाशिक -३०/५/२३

इंडिक टेल्स’ नामक मनुवादी वृत्ती असलेल्या वेबसाईटवर भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक आद्य समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लिखाण करण्यात आलेलं आहे.
सावित्रीबाई फुलेंच्या कामाबद्दल ‘इंडिक टेल्स’ च्या लेखात अतिशय अपमानजनक भाषेचा वापर करण्यात आला आहे.
हे अत्यंत वेदनादायी आहे. छत्रपती-फुले-शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सावित्रीबाईंची बदनामी करण्याचा हा प्रकार अतिशय संतापजनक आणि घाणेरडा असून त्याचा मी तीव्र निषेध करीत असल्याचे म्हटले आहे

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावं आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. शिक्षण देत असताना विसाव्या शतकातील तत्कालीन मनुवादी वृत्तीच्या लोकांकडून दगड धोंडे, शेणाचे प्रहार आपल्या अंगावर झेलले.
समाजातील विषमता दूर करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची केले. या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आजही समाजातील दृष्ट प्रवृत्तींकडून प्रहार केला जात असल्याचे म्हटले आहे.
आक्षेपार्ह लेखनातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल गलिच्छ प्रचार करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ या वेबसाइटविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
या संतापजनक प्रकाराचा सर्व थरातून, देशभरातून निषेध होणे गरजेचे आहे.
इंडिक टेल्स आणि हिंदू पोस्ट यांच्या विरोधात आज संध्याकाळपर्यंत कारवाई न झाल्यास उद्या मी स्वतः मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन याविरोधात कारवाई करण्याचा आग्रह धरणार आहे आणि जोपर्यंत ठोस उत्तर मिळत नाही तोपर्यंत तिथे ठिय्या मांडणार आहे.अशी संतापजनक प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केलीय ..

तेजस पुराणिक, नाशिक प्रतिनिधीसह ब्युरो रिपोर्ट ,एम डी टी व्ही न्यूज मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here