तळोदा /नंदुरबार -५/५/२३
तळोदा येथील तलाठी श्री बळीराम चाटे यांना नंदुरबार जिल्हा उत्कृष्ट तलाठी म्हणून निवड करण्यात आली
शासन निर्णयानुसार दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यातून एक उत्कृष्ट तलाठी म्हणून निवड करण्यात येत असते व निवड झालेल्या आदर्श तलाठी प्रमाणपत्र पाच हजार रुपये धनादेश देऊन 1 मे महाराष्ट्र कामगार दिन रोजी सन्मानित करण्यात येत असते
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
त्या अनुषंगाने तळोदा येथील तलाठी श्री बळीराम चाटे यांनी स्वतःचे नियमित कामकाज पाहून तळोदा उपविभागातील तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकारी यांना 7/12 संगणकीकरण करण्याबाबत हेल्प डेक मध्ये उल्लेखनीय कामकाज केले
दुय्यम निबंध यांच्याकडून आलेले नोंदणीकृत दस्त व शेतकऱ्यांकडून आलेले. फेरफार प्रलंबित न ठेवणे अशा विविध काम वेळेवर पूर्ण केल्यामुळे यावर्षी नंदुरबार जिल्हा उत्कृष्ट आदर्श तलाठी म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
त्यांना नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ . विजयकुमार गावित यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं .. यावेळी जिल्ह्धिकारी मनीषा खत्री ,यांच्यासह शासकीय अधिकारी ,जि प अध्यक्षा सुप्रिया गावित ,खासदार डॉ हीना गावित उपस्थित होते ..
महेंद्र सूर्यवंशी,तळोदा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज