TALODA AGRI :पथनाट्याच्या सादरीकरणातून शेतकऱ्यांना पिक विमा योजनेची माहिती..

0
500

तळोदा :31/7/23

अंमल पाडा आपकी जय बहुउद्देशीय संस्था आणि कृषी विभाग तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2023 अंतर्गत विविध योजनांची माहिती देण्यासाठी उपक्रम राबविण्यात आला. त्यानंतर गत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजना, पौष्टिक तृणधान्य वर्ष, आणि पिक विमा योजना चा प्रसार आणि प्रचार शेतकऱ्यांपर्यंत व्हावा या हेतूने संस्थेच्या कलापथकाने पथनाट्याचे सादरीकरण केले..

ms t2
1

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

या कलापथकात एकूण दहा कलावंतांचा समावेश होता. स्थानिक बोली भाषेत या कलापथकाने पथनाट्याचे सादरीकरण केले. तळोदा तालुक्याच्या दुर्गम भागातील लखपूर करडे, गोंडाळा सोमावल, शिरवे सतोना आधी गावातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी जनजागृतीसाठी ही मोहीम राबवण्यात आली. पथनाट्य पाहण्यासाठी गावातील शेतकऱ्यांसह जेष्ठ शेतकरी महिला बचत गट प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदुरबार राकेश वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला होता. शहादा कृषी उपविभागीय अधिकारी तानाजी खर्डे, मीनाक्षी वळवी, आदींची उपस्थिती होती.

महेंद्र सूर्यवंशी, तळोदा शहर प्रतिनिधी एमडी टीव्ही न्यूज नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here