तळोदा /नंदुरबार -१७/७/२३
छत्रपती शिवाजी महाराज यांना व वंदनीय बाळा साहेब ठाकरे तसेच माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले .. त्यावेळी आमदार आमाशा पाडवी यांनी त्यांचा मनोगतात रुग्ण सेवा ही ईशवर सेवा आहे .. या रुग्णवाहिकेची गरज कमीत कमी लोकांना लागो व ज्यांनी गरज लागलीच तर जो या रुग्णवाहिकेत जाईल तो बरा होऊनच सुख रूप आपल्या घरी यावा अशी मनोकामना केली
तसेच मातोश्री प्रतिष्ठामला आणलेल्या रुग्णवाहिकेसाठी शुभेच्छा दिल्या .. शिवसेनासह सम्पर्क प्रमुख अरुण चौधरी यांनी मातोश्री प्रतिष्ठाचें सर्व पदाधिकारी हे शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याने सहाजिकच त्यांच्यात 80 टक्के समाजकारण हे भिनलेले असल्याने ते पुढेही रुग्णांची सेवा करतच राहतील असा विश्वास दर्शवला
तसेच प्रगतशील शेतकरी हाजी निसार मकराणी यांनी आपल्या मनोगतात जिवन जगत असताना आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने आज जे मातोश्री प्रतिष्ठान अत्यंत चांगले कार्य करत आहे त्यामुळे त्यांना जनतेचे देखील मोठ्या प्रमाणत सहकार्य मिळत आहे
मातोश्री प्रतिष्ठाच्या माध्यमातून गरजू रूग्णांची अशीच सेवा घडत राहावो अशी अपेक्षा व्यक्त केली ..
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंगन्यूज, जॉबअपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा. https://bit.ly/3UoK7E0
हे हि वाचा : Breaking : घरकुल घोटाळ्यातील आरोपींवर कधी होणार कारवाई?..
MLA SATYAJIT TAMBE:नादुरुस्त जि. प. शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत? आमदार तांबेनी घेतली वृत्ताची दखल…
रुग्णवाहिकेचे लोकार्पण उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी व्यासपीठावर आनंद सोनार शिवसेना उपजिल्हा प्रमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती च्या संचालिका रेखा रमेश माळी, शिवसेना जिल्हा संघटक राम वाडीले, मा नगरसेविका सौ प्रतीक्षा दुबे ,कोमल सोनार ,संजय गांधी निराधार चे मा अध्यक्ष श्री प्रवीण पाडवी ,माजी उपनगरध्यक्ष गौतम जैन ,युवा सेना तालुका प्रमुख कल्पेश सूर्यवंशी ,तालुका संघटक विनोद वंजारी, युवा सेना शहर प्रमुख जगदीश चौधरी,सुरज माळी ,विजय मराठे, नितेश सोनार, नितीन ठाकरे, पुष्पेंद्र दुबे आदी उपस्थित होते ..
सूत्रसंचालन अविनाश मराठे यांनी केले तर प्रस्तावना शिवसेना शहर प्रमुख व मातोश्री प्रतिष्ठाचे अध्यक्ष श्री जितेंद्र दुबे यांनी केली .. तर आभार संजय पटेल यांनी मानले …
महेंद्र सूर्यवंशी ,शहर प्रतिनिधी ,तळोदा ,एम डी टी व्ही न्यूज ,नंदुरबार