तळोदा ख.वि. संघाच्या चेअरमनपदी गोविंद पाटील

0
427

तळोदा :- येथील सहकारी खरेदी विक्री संघांच्या चेअरमनपदी गोविंदभाई पाटील तर व्हाईस चेअरमनपदी पुरुषोत्तम चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

तळोदा तालूका खरेदी विक्री संघ निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी आमदार उदेसिंग पाडवी, आमदार राजेश पाडवी, माजी मंत्री पदमाकर वळवी, भरतभाई माळी, डॉ शशिकांत वाणी व इतर सर्वपक्षीय नेत्यांनी प्रयत्न केले. काल दि १९ रोजी संचालक मंडळाची निवड ही बिनविरोध करण्यात आली. या संस्थेची बिनविरोध निवडीची परंपरा राखण्यात लोकप्रतिनिधीना यश आले आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

संचालक मंडळाची निवड सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी राहील. आजच्या सभेत गोविंदभाई पाटील, पुरुषोत्तम चव्हाण, संजय पटेल, नितीन पाटील, सुरेश दत्तात्रय पाटील, कांतीलाल भापकर, चंदु हरी भोई, अरुण नथ्थु मगरे, विलास कृष्णा लोखंडे, संजिव रमेश चौधरी, जितेंद्र रघुनाथ पाटील, सुभाष रामदास पाटील, पुनमचंद ओंकारचंद भिल, सौ आशाबाई सुभाष पटेल, सौ सुरेखा मुरलीधर सागर, भरत कांतिलाल पाटील, अविनाश प्रल्हाद भारती आदी उपस्थित होते.

महिंद्र सूर्यवंशी. एन.डी.टी.व्ही. न्युज तळोदा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here