नंदुरबार -२५/७/२३
तळोदा नगरपरिषद हद्दीतील अमरधामचे प्रवेशद्वार धोकादायक बनले आहे. तळोदा शहरातील व आसपासच्या ग्रामीण परिसरातील नागरिक अंत्यविधीसाठी हजारोंच्या संख्येने अमरधाम मध्ये येत असतात.
अमरधामचे प्रवेशद्वार कधी कोणाचा जीव घेईल आणि मोठा अनर्थ होईल हे प्रवेशद्वाराच्या आजच्या स्थितीमुळे चिंतेचे कारण बनले आहे.प्रवेशद्वाराची कमान बांधकामापासून सुटली आहे. वेळीच पालिका प्रशासनाने दुरुस्ती करणे गरजेचे आहे. रामरथ गाडी, मोटारसायकली यांच्या येण्याजाण्याने कंपन होत असते त्यामूळे खिळखिळे झालेले प्रवेशद्वार अधिक धोकेदायक बनत आहे.
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
तळोदा नगरपरिषदेत प्रशासक लागु झाल्यापासून नगरपालिका राम भरोसे असल्याचे वेळोवेळी सिद्ध होत आहे. त्यातल्या त्यात मुख्याधिकारी यांनाच प्रशासक म्हणून नेमणुक केलेली आहे. परंतु मुख्याधिकारी सपना वसावा यांची बढती झाल्याने त्यांची बदली अहमदनगर महापालिकेत झाली असल्याने एक महिना उलटूनही तळोदा नगरपालिकेला कायम मुख्याधिकारी मिळाले नाही. अतिरिक्त भार सांभाळणारे अधिकारी नगरपालिकेत नागरिकांना भेटत नाही. पालिकेत येतच नाहीत तर भेटतील कसे? यामुळे तळोदा शहरवासीयात नाराजीचा सुर निघत आहे.
अमरधामचे प्रवेशव्दार चिंतेचा विषय ठरत आहे.बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देऊन वेळीच दुरुस्ती केली नाही तर मोठा अनर्थ होण्याची दाट शक्यता आहे.
नितीन गरुड ,तळोदा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज ,नंदुरबार