TALODA:कृषि विभागाकडून दलेलपुर येथे पिक विमा व तृणधान्य किट वाटप..

0
236

नंदुरबार -२३/७/२३

दलेलपुर ता तळोदा येथे दि २२ रोजी कृषि विभागाकडून पिक विमा व पौष्टीक तृणधान्य बियाणे वर्ष निमित्ताने लहानकिट शेतकरी बांधवांना वाटप करण्यात आले.
पिक विमा योजनेची जनजागृती होणेबाबत खरेदी विक्री संघाचे संचालक चंदु भोई यांनी निवेदनाद्वारे मागणी केली होती.

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
शासकिय योजनांचा लाभ घेण्यासाठी योजनांची अंमलबजावणीसह जनजागृती करणे महत्वाचे असल्याने आज दलेलपुर येथे कृषि विभागातील मंडळ कृषिअधिकारी आर आर मंचरे, पर्यवेक्षक दाने,सहाय्यक गुशी पावरा, सरपंच राजु प्रधान यांच्या मार्फत पिक विमा व शेती विषयक इतर योजनांची माहिती देण्यात आली.
तसेच पौष्टीक तृणधान्य बियाणे वर्ष निमित्ताने शेतकरी बांधवांना बियाणे किट देण्यात आले.
नितीन गरुड ,तळोदा तालुका प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज .. नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here