तज्ञांची शाळेला भेट ; विविध उपक्रमात घेतला सहभाग
तळोदा :- जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था अंतर्गत जन भागीदारी बाबत लोकसभागातून करावयाचे उपक्रमासाठी शाळा भेट करण्यात आली. या विषयावर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दलेलपूर येथे भाषा व गणित पेटीच्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानसाठी वापर बाबत प्रात्यक्षिक कृती तसेच पोषक भिंती रंगविणे, गावाचा सार्वजनिक दर्शनी भाग / शाळा या ठिकाणी रंगविणे यासाठी सहभाग घेतला.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
आजच्या दिवशी शाळा भेटीत विद्यार्थी पालक शिक्षक यांच्याशी संवाद साधला.G20 च्या अनुषंगाने जनजागृती व्हावी, यासाठी शिक्षकांनी दिनांक १ जून ते १५ जून या कालावधीत विविध कार्यक्रम उपक्रम आयोजित करावे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. डायट जिल्हा शैक्षणिक योजना विकसित करते आणि शाळा आणि अध्यापनाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवते. हे शाळांना थेट सहाय्य करण्यासाठी हस्तक्षेपांची रचना करते आणि जिल्ह्यातील विशेष गटांसह कार्य करते. डायट जिल्ह्याच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणातील गुणवत्तेच्या समस्यांचे निराकरण करते.
हे सुध्दा वाचा:
साक्षी हत्याकांडतील आरोपींवर तात्काळ कारवाई करा – MDTV NEWS
BIG BREAKING… मान्सूनचा प्रवासात चक्रीवादळाचा खोडा ! – MDTV NEWS
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
शाळा भेटीत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबारचे वरिष्ठ अधिव्याख्याता रमेश चौधरी, अधिव्याख्याता पंढरीनाथ जाधव, अधिव्याख्याता सुभाष वसावे, केंद्र साधन व्यक्ती शर्मिला चौधरी, विषय सहाय्यक तळोदा गटसाधन केंद्र नंदन पाटील यांनी सहभाग घेतला. तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजू प्रधान, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य अजय धानका यांच्यासह पालक, ग्रामस्थ व शिक्षकवर्ग उपस्थित होते.
हे सुध्दा वाचा:
साक्षी हत्याकांडतील आरोपींवर तात्काळ कारवाई करा – MDTV NEWS
BIG BREAKING… मान्सूनचा प्रवासात चक्रीवादळाचा खोडा ! – MDTV NEWS
नितीन गरुड. एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, तळोदा ग्रामीण.