तळोदा /नंदुरबार -२८/७/२३
सध्या वाढता प्रदूषण व होणाऱ्या जंगल तोडीमुळे मानवाच्या शरीरावर अनेक प्रकारच्या रोगराईंनी आक्रमण केले आहे जर मानवाला शरीर सुदृढ व निरोगी ठेवायचे असेल तर विकास व डेव्हलपमेंट च्या नावावर शेती झाडे जंगल नष्ट होताना दिसत आहे शासनाने झाडे तोडताना नवीन झाडे लावणे बंधनकारक केले आहे परंतु झाडे जोडताना फार घाई केली जाते नवीन झाड लावून त्याला जगवण्यासाठी कोणीही पुढाकार घेताना दिसून येत नाही
हे हि वाचा :बिग ब्रेकिंग : कौटुंबिक शेती वादातून खून,आरोपी फरार ..
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
ते कुठेतरी थांबणे आवश्यक आहे व सुदृढ निरोगी आयुष्य जगता यावे यासाठी प्रत्येक नागरिकांनी स्वतः झाडे लावून जगवणे आवश्यक आहे. यावर्षी सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने व वन विभागातर्फे विविध रोपेही अत्यंत अल्प दराने विक्रीस उपलब्ध केलेली आहेत तरी नागरिकांनी आपण स्वतः वैयक्तिक कमीत कमी एक झाड लावण्याची व ते मोठे करण्याची जबाबदारी स्वीकारायला हवी तरच निसर्ग आपल्याला साथ देईल अन्यथा आपल्या अनेक संकटांना तोंड द्यावे लागेल व हे आपण गेल्या काळात पाहिले देखील आहे त्यामुळे नागरिकांनी झाडांचे महत्त्व ओळखायला हवे गेल्या दोन वर्षापासून लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी हे देखील यांच्या वाढदिवशी शेकडो झाडे नागरिकांना मोफत वाटप करीत आहे तसेच अनेक सामाजिक संस्था देखील झाडे वाटपामध्ये पुढाकार घेताना दिसत आहे परंतु ते जगवण्याची सर्वस्व जबाबदारी ही प्रत्येकाने स्वतःवर घेणे आवश्यक आहे
महेंद्र सूर्यवंशी,तळोदा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज नंदुरबार