तळोदा /नंदुरबार -२४/७/२३
मणिपूर घटनेच्या व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाल्यानंतर भारतभर पडसाद उमटत आहेत. आज दि २४ रोजी तळोदा येथे निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. विविध संघटना मोर्चात सामील झाल्या होऊन निषेध नोंदविण्यात आला आहे.
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
देशात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. मणिपूर येथील महिलांवर झालेले अत्याचार देशाला हादरुन टाकणारे आहेत. या अत्याचाराचा समुळ नायनाट व्हायला पाहिजे.आदिवासी समाजाने आपले हक्क,अधिकारासाठी आता पक्ष बाजूला ठेवून एक होणे गरजेचे आहे असे विविध संघटना व राजकिय पक्षातील नेत्यांनी एकमत व्यक्त केले.
तळोद्यात निषेध मोर्चाची सुरुवात भगवान बिरसा मुंडा चौक पासुन दुपारी १२:०० वाजता करण्यात आली. तळोदा तालुक्यातील आदिवासी समाजाने मोठया संख्येने सहभाग नोंदविला. मोर्चात फलक तसेच आदिवासी एकतेच्या घोषणा देण्यात आल्या. भगवान बिरसा मुंडा चौका पासुन मोर्चास सुरुवात झाली. स्मारक चौक कडून तहसिल कार्यालय परिसरात मोर्चा धडकला. निषेध मोर्चाच्या समारोप प्रसंगी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. माजी मंत्री पद्माकर वळवी, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष सुहास नाईक, सामाजिक कार्यकर्ते कांतिलाल पाडवी सर, भिलिस्थान टायगर ट्रायबल सेनेचे जिल्हाध्यक्ष देविसिंग वळवी,बिरसा फायटर्सचे दयानंद चव्हाण, जिल्हा परिषदच सदस्य मोहन शेवाळे, माकपच्या इंद्रा ताई,सरपंच संघटनेचे दारासिंग गावित, जय आदिवासी युवा शक्तीचे जिल्हाध्यक्ष विनोद माळी आदींनी आपले विचार व्यक्त केले.
मणिपूर येथील महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यास इंद्राताई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून निषेध मोर्चास सुरुवात करण्यात आली.
आंदोलकांनी मणिपूर मधील आदिवासी महिलांसोबत झालेल्या अमानवीय घटनेचा तीव्र निषेध नोंदविला.
मोर्चात भिलिस्थन टायगर ट्रायबल सेना,बिरसा फायटर्स, जय आदिवासी युवा शक्ती, सरपंच आघाडी संघटना, तालुक्यातील सरपंच, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,परीवर्तन युवा मंच आदी संघटना तसेच राजकिय पक्षातील नेत्यांनी सहभाग नोंदविला.
नितीन गरुड ,तळोदा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज ,नंदुरबार