तळोदा… प्रतापपूर येथे ६० महिलांची आरोग्य तपासणी

0
360

तळोदा :- तालुक्यातील प्रतापपूर येथे पीडब्ल्यूसी इंडिया फाउंडेशन यांच्या सीएसआर माध्यमातून स्पेरुल फाउंडेशन मार्फत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य शिबिरात डॉ.के.के.पावरा यांनी ६० रुग्णांची तपासणी केली.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

या आरोग्य शिबिरात रक्तदाब, रक्तशर्करा आणि जनरल चेकअप करण्यात आले. तसेच गरज असलेल्या रुग्णांना औषधोपचार करण्यात आला. शिबीरामुले गावातील महिलांनी समाधान व्यक्त केले. यावेळी सरपंच कमलबाई पावरा, उपसरपंच सुरेश इंद्रजीत यांचे सहकार्य लाभले. आरोग्य शिबीर यशस्वीतेसाठी स्पेरुल फाउंडेशनचे प्रकल्प समन्वयक सिद्धेश्वर गायकवाड व यांनी परिश्रम घेतले.

महिंद्र सूर्यवंशी. एमडीटीव्ही न्युज, तळोदा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here