तळोदा /नंदुरबार -20/7/23
आदिवासी दुर्गम भागात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवाशांना ने आण करणाऱ्या काली पिली गाड्यांना नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागातून विशेषता तळोदा शहरातून ग्रामीण भागातील लोकांची पसंती असल्याचे दिसून येत असते.. ज्या ग्रामीण भागात लाल परी मोजक्या पोहोचतात, सकाळी एक आणि रात्री मुक्कामी असणारी लाल परी प्रवाशांची गैरसोय होण्यास जबाबदार ठरते तेव्हा प्रवाशांना कालीपिलीच्या वाहनांचा आधार घ्यावा लागत असतो..
परंतु महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचा ओढ साधारण शहर भागाकडे जास्त असल्याचं कायम दिसून येतं. त्यामुळे एका शहरातून एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात किंवा शहरात जाण्यासाठी प्रवाशांची सोय होते खरी.. महिलावर्ग आणि तरुणींची महाविद्यालयीन युवतींची संख्या लक्षणीय असते.. मात्र सध्या तळोदा शहरात काली पिली टॅक्सी चालकांचे भवितव्य धोक्यात आल्याचे दिसून येते.. कारणही तसेच आहे महायुती सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी 50% आरक्षणाची सवलत एसटी प्रवासात आणली त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी आता एसटी कडे एकच गर्दी केल्याचे दिसून येत आहे.. त्याचा दुरगामी परिणाम टॅक्सी चालकांच्या प्रवासी दळणवळणावर झाल्याचे पाहायला मिळत आहे..
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
ही योजना लाभदायी ठरत असली तरी टॅक्सी चालकांसाठी जीवन मरणाचा प्रश्न निर्माण करणारी आहे.. प्रवाशांचा ओढ टॅक्सी कडे कमी होत गेला तर भविष्यात पुढे काय व्हायचं या चिंतेने टॅक्सी चालक संभ्रमात आहे.. तळोदा तालुकाच नव्हे तर जवळपासच्या परिसरातले टॅक्सी चालक देखील या संभ्रमात असल्याकारणाने सर्व टॅक्सी चालकांनी एकच दर केला तर वाहतुकीची होणारी ही समस्या तर सुटेलच, टॅक्सी चालकांकडे पाठ फिरवलेले प्रवासी पुन्हा टॅक्सी चालकांकडे येण्यासाठी माघारी फिरतील हे तेवढेच खरे.. लाल परी ची ही योजना उपयुक्त आहेच परंतु टॅक्सी युनियनने देखील टॅक्सी चालकांच्या या प्रश्नावर गांभीर्याने विचार करून चा धोक्यात असलेला अस्तित्वाचा प्रश्न सोडवण्यात पुढाकार घेण्याची गरज आहे अशी दबक्या आवाजात चर्चा सध्या टॅक्सीचालकांमध्ये सुरू असल्याचं कळतंय.. लाल परी जरूर प्रवास करा, परंतु काली पिली टॅक्सीतनं ग्रामीण भागाला जोडणाऱ्या प्रवासी वाहतुकीवर होणाऱ्या दूरगामी परिणामाला नक्की कोण जबाबदार ठरेल? ही सांशकता टॅक्सी चालकांच्या मनात आजही कायम आहे.. आगामी काळात लालपरी जोरात धावणारच टॅक्सीचालकांच अस्तित्व धोक्यात आलंय हे मानावेच लागेल.. वाढीव दर आकारणी प्रवाशांकडून करण्यापेक्षा योग्य ती आकारणी केल्यास कठीण प्रसंगात ग्रामीण भागातील महिला तरुणी, सामान्य नागरिक प्रवासी टॅक्सीचा आधार घेतील आशा करूया..
महेंद्र सूर्यवंशी तळोदा प्रतिनिधी एमडीटीव्ही न्यूज नंदुरबार